Sanjay Raut : देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा

Sanjay Raut on INDIA Alliance : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येईल. त्यापूर्वी एक्झिट पोलचा पोळ फुटला. सर्वांनी भाजपच्या पारड्यात मत टाकले आहे. पण संजय राऊत यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येण्याचा दावा केला आहे. किती आहे त्यांचा बहुमताचा आकडा?

Sanjay Raut : देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा
राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 11:24 AM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 1 जून रोजी संपली. त्यानंतर लागलीच एक्झिट पोलचा पोळा फुटला. देशातील झाडून सर्वच एक्झिट पोलने भाजपला कौल दिला आहे. पण संजय राऊत यांना इंडिया आघाडीच देशात सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास आहे. त्यांनी आकडेवारी सादर करत हा बहुमताचा आकडा सुद्धा सांगितला. हा एक्झिट पोल नाही तर जनतेच्या मनातील कौल असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते इंडिया आघाडीला देशात इतक्या जागा मिळतील. त्याआधारे सत्तेचा सोपान गाठता येईल.

काय केला दावा

संजय राऊत यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारविरोधात मोर्चा सांभाळला आहे. लोकसभेच्या प्रचारात तर त्यांच्या शब्दांना चांगलीच धार आली होती. पूर्वीपासूनच ते लोकसभेत यावेळी मोठा फेरबदल होईल, असा दावा करत आलेले आहेत. देशातील हवा बदलल्याची त्यांनी यापूर्वीच चर्चा केली होती. मोदींवर त्यांनी तिखट टीकास्त्र सोडले होते. या लोकसभेच्या रणधुमाळीत मोदी अनेक टप्प्यात राज्यात डेरेदाखल झालेले दिसले. यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपच्या सत्तेच्या राजकारणाल सुरुंग लावेल, असा दावा राऊतांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

बहुमताचा आकडा काय

एक्झिट पोलचे दावे त्यांनी सरसकट फेटाळून लावले आहे. त्यांच्या मते देशात एनडीएचे नाही तर इंडिया आघाडीचे सरकार येईल. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. 295 ते 310 जागा इंडिया आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. त्यांनी एक्झिट पोलवर चांगलेच तोंडसूख घेतले.

राज्यात जागा किती?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या रणसंग्रामात 35 हून अधिक जागांवर विजय होईल, असा दावा त्यांनी केला. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे दूर करत नाही, असे ते म्हणाले. गेले काही दिवस मी ऐकत होतो बारामती मध्ये सुप्रियाताई यांचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीने सांगत होतो सुप्रियाताई सुळे किमान दीड लाख मताने जिंकतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील. काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्य देशांमध्ये परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.