देवाशी कुणी युती करतं का?; कपिल सिब्बल यांनी नरेंद्र मोदी यांना डिवचलं

लोकसभा निवडणूक 2024 : डॉ. मनमोहन सिंह सरकारात मंत्री असलेले कपिल सिब्बल यांनी वेळोवेळी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यांनी त्यांना पुन्हा डिवचलं आहे.

देवाशी कुणी युती करतं का?; कपिल सिब्बल यांनी नरेंद्र मोदी यांना डिवचलं
Kapil Sibal Attack PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 8:09 PM

लोकसभा 2024 निवडणूकांचे निकाल लागले आहेत. आता 17 वी लोकसभा भंग करण्यात आली आहे. आता 18 लोकसभेसाठी बहुमत स्थापन करण्यासाठी भाजपाने आपल्या एनडीएच्या सहकाऱ्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. दुसरीकडे प्रसिद्ध वकील आणि कॉंग्रेसचे राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड टीका केली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या काळात मंत्री असलेल्या कपिल सिब्बल यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स ( पूर्वीचे ट्वीटर ) एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल हे नेहमीच भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाकाजावर टीका करीत असतात. मनमोहन सिंह यांच्या काळात मंत्री असलेले कपिल सिब्बल यांनी मोदीवर टीप्पणी केली आहे. त्यांनी ट्वीटरवरील पोस्टमध्ये लिहीलेय की मी मोदींना विचारू इच्छीतो की… काय देवासोबत कोणी युती करु शकतं का ? भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी एनडीएच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. जास्तीत जास्त मित्र जोडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर कपिल सिब्बल यांनी मार्मिक शब्दात भाष्य केले आहे. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत आपण बायोलॉजिकल नाही. तर परमेश्वरानेच मला पृथ्वीवर लोकांचे कल्याण करण्यासाठी पाठविले आहे, असे म्हटले होते.

kapil Sibal Attack PM Narendra Modi at x 

कपिल सिब्बल यांनी मार्च महिन्यात इलेक्ट्रोरल बॉंडच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठी टीका केली होती. त्यावेळी कपिल सिब्बल म्हणाले होते की इलेक्ट्रोलची माहीती बाहेर पडल्यानंतर यात लाभाच्या बदल्यात लाभ देण्याचा कुठे न कुठे प्रयत्न झाले आहे. कोणीतरी म्हटले होते की, ‘खाऊंगा ना खाणे दुंगा’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या आधी भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी या वाक्याचा उपयोग मोदी यांनी केला होता.

22 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी प्रचारात घुसखोरांना संपत्ती वाटणारे अशी टीका कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर केली होती. तेव्हा कपिल सिब्बल म्हणाले की एका बाजूला तुम्ही राममंदिराचे उद्घाटन करता, आणि दुसरीकडे द्वेष पसरवता. पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकासची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या कुटुंबियांनी देखील संस्कृती त्यांना शिकवली नसेल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.