Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Election 2024 Results : मोदी सरकारचे हे मंत्री चितपट, निवडणुकीत झाला दारूण पराभव, वाचा एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. या निवडणुकीमध्ये मोदी सरकारचे असे अनेक मंत्री आहेत जे चितपट झाले. त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी बहुसंख्य मंत्री हे उत्तर प्रदेशातील आहेत.

Lok Sabha Election 2024 Results : मोदी सरकारचे हे मंत्री चितपट, निवडणुकीत झाला दारूण पराभव, वाचा एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 1:33 PM

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कोणत्याही पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 240 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. एनडीएबद्दल बोलायचं झालं तर भाजपप्रणित एनडीने बहुमतासाठी आवश्यक असलेला 272 ही मॅजिक फिगर पार केली असून त्यांना 292 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या पारड्यात 234 जागा पडल्या.

मात्र या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून अनेक राज्यात भाजपची पीछेहाट झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील अनेक धक्कदायक निकाल समोर आले, त्यामध्ये मोदी सरकारमधील असे अनेक मंत्री असे आहेत जे चितपट झाले. त्यांना दारूण पराभवचा सामना करावा लागला. त्यापैकी सर्वात जास्त मंत्री हे उत्तर प्रदेशमधील आहे. मोदी सरकारमधील कोणते मंत्री पराभूत झाले, ते जाणून घेऊया.

  1. कैलाश चौधरी : राजस्थानच्या बारमेरमधून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांना दारूण पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार राम बेनिवाल यांनी चौधरी यांचा ४ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. त्यांना 7 लाख 04 हजार 676 मतं मिळाली तर चौधरी यांना 2 लाख 86 हजार 733 मतं मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले तर तर अपक्ष रवींद्र भाटी हे 5 लाख 86 हजार 500 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.
  2. आर के सिंग : बिहारमधील आरामधून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री आरके सिंह यांचाही पराभव झाला. सीपीआयएमचे सुदामा प्रसाद यांनी त्यांचा 59 हजार 808 हून अधिक मतांनी पराभव केला. सुदामा प्रसाद यांना 5 लाखांहून अधिक मते मिळाली, तर सिंह यांना 469574 लाख मते मिळाली.
  3. निसिथ प्रमाणिक : बंगालच्या कूचबिहार येथे तृणमूलचे जगदीश चंद्र वसुनिया यांनी भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांचा 39 हजार 250 मतांनी पराभव केला. वसुनिया यांना 7 लाख 88 हजार 375 मतं तर प्रामाणिक यांना 7 लाख 49 हजार 125 लाख मते मिळाली.
  4. राजीव चंद्रशेखर : केरळमधील तिरुअनंतपुरममधून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या शशी थरूर यांनी त्यांचा 16 हजार 077 मतांनी पराभव केला. थरूर यांना 3 लाख 58 हजार 155 लाख मते मिळाली तर चंद्रशेखर 3 लाख 42 हजार 078 लाख मते मिळाली.
  5. अर्जुन मुंडा : झारखंडच्या खूंटी येथील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हेही पराभूत झाले. तेथे काँग्रेसचे काली चरण मुंडा हे 1 लाख 49 हजार 675 च्या मताधिक्याने जिंकले. अर्जुन मुंडा हे 3 लाख 61 हजार 972 मतांनी दुसऱ्या स्थानी राहिले तर काली चरण मुंडा यांना 5 लाख 11 हजार 647 मतं मिळाली.
  6. अजय मिश्र टेनी : दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी हे उत्तर प्रदेशातील खेरीमधून निवडणूक हरले. सपाच्या उत्कर्ष वर्मा यांनी टेनी यांचा ३४ हजार ३२९ मतांनी पराभव केला. टेनी यांना 5 लाख 23 हजार 036 लाख मतं तर जिंकलेल्या उत्कर्ष वर्मा यांना 5 लाख 57 हजार 365 लाख मते मिळाली. तर बसपाचे उमेदवार अंशय सिंग कालरा यांना 1 लाख 10 हजार 122 मतं मिळाली.
  7. स्मृती ईराणी : भाजपच्या केंद्रीय मंत्री, सतत चर्चेच असलेल्या स्मृती इराणी यांचा उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये दारूण पराभवा झाला. तेथे काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी इराणी यांचा 1 लाख 67 हजार 196 लाख मतांनी पराभव केला. केएल शर्मा यांना 5 लाख 39 हजार 228 लाख तर इराणी यांना 3 लाख 72 हजार 032 लाख मते मिळाली.
  8. महेंद्रनाथ पांडे : यूपीतील चंदौलीमधून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे निवडणूक हरले. सपाचे वीरेंद्र सिंह यांनी महेंद्रनाथ पांडे यांचा 21 हजार 565 मतांनी पराभव केला. वीरेंद्र सिंह यांना 4 लाख 74 हजार 476 तर पांडे यांना 4 लाख 52 हजार 911 लाख मते मिळाली. बसपचे सत्येंद्र सिंह मौर्य तिसऱ्या स्थानावर आहेत.
  9. कौशल किशोर : यूपीच्या मोहनलालगंजमधून सपाच्या आरके चौधरी यांनी भाजपच्या कौशल किशोर यांचा ७० हजार २९२ हजार मतांनी पराभव केला. आरके चौधरी यांना 6 लाख 67 हजार 869 तर कौशल किशोर यांना 5 लाख 97 हजार 577 मतं मिळाली.
  10. भानू प्रताप सिंग : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री भानू प्रताप सिंह यांचा यूपीमधील जालौनमधून 53हजार 898 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. तेथे सपाचे नारायणदास अहिरवार यांनी शानदार विजय नोंदवला. अहिरवार यांना 5 लाख 30 हजार 180 मते मिळाली तर सिंग 4 लाख 76 हजार 282 मते घेऊन दुसऱ्या स्थानावर आहेत.
  11. साध्वी निरंजन ज्योति : यूपीतील फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती याही पराभूत झाल्या. तेथए सपाचे नरेश चंद्र उत्तम पटेल यांनी साध्वी यांचा 33 हजार 199 मतांनी पराभव केला. नरेश चंद्र यांना 5 लाख 328 मतं तर साध्वी यांना 4 लाख 67 हजार 129 मते मिळाली.
  12. संजीव कुमार बालियान : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव कुमार बल्यान यांना यूपीतील मुझफ्फरनगरमधून दारूम पराभव पत्करावा लागला. सपाचे हरेंद्र सिंह मलिक यांनी त्यांना 24 हजार 672 मताधिक्याने हरवलं. मलिक यांना 4लाख 70 हजार 721 लाख मते मिळाली. तर बल्यान यांना 4 लाख 46 हजार 049 लाख मते मिळाली.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.