Narendra Modi : ही माझी मोठी कमाई आहे; एनडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक
NDA Alliance Meeting : एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले. एनडीएचा नेता म्हणून तुम्ही सर्वांनी सर्व संमतीने मला निवडले हे माझं सौभाग्य आहे, असे त्यांनी म्हटले. आपल्या दोघांमध्ये विश्वासाचा पूल मजबूत आहे. हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे.

एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले. एनडीएचा नेता म्हणून तुम्ही सर्वांनी सर्व संमतीने मला निवडले हे माझं सौभाग्य आहे, असे त्यांनी म्हटले. आपल्या दोघांमध्ये विश्वासाचा पूल मजबूत आहे. हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. केंद्रीय सभागृहात आज एनडीएच्या संसदीय दलाची बैठक झाली. तेथे एकमताने नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. राजनाथ सिंग, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजि पवार, चिराग पासवान यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
लाखो कार्यकर्त्यांचे मानले आभार
ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांनी दिवस पाहिला नाही. रात्र पाहिली नाही. प्रचंड उन्हात प्रत्येक दलाच्या कार्यकर्त्याने जे परिश्रम केले आहे, त्यांना मी मान झुकवून नमन करतो. माझं सौभाग्य आहे की, एनडीएचा नेता म्हणून तुम्ही सर्वांनी सर्व संमतीने मला निवडले. माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली. त्यासाठी मी तुमचा प्रचंड आभारी आहे. व्यक्तीगत आयुष्यात मला जबाबदारीची जाणीव होते. 2019 साली मी या सभागृहात बोलत होतो. तुम्ही नेता म्हणून मला निवडलं होतं. त्यावेळी मी विश्वास या शब्दावर जोर दिला होता. तुम्ही आज मला पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. याचा अर्थ आहे की आपल्या दोघांमध्ये विश्वासाचा पूल मजबूत आहे. हे अतूट नातं विश्वासाच्या आधारावर आहे. ही सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळेच हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा आहे. तुमच्याप्रती आभार मानणारा आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना मांडल्या.
फार कमी लोक या गोष्टीची चर्चा करत आहेत. भारताच्या लोकशाहीची मोठी ताकद पाहा. एनडीए आज देशात २२ राज्यात सरकार बनवून सेवा करण्याची संधी दिली आहे. आपलं अलायन्स खऱ्या अर्थाने भारताचे स्पिरीट आहे. भारताचा आत्मा आहे. आपल्या देशात दहा असे राज्य आहेत जिथे आपल्या आदिवासींची संख्या मोठी आहे. निर्णायक आहे. जिथे आदिवासींची संख्या अधिक आहे, त्या १० राज्यांपैकी ७ राज्यात एनडीए सेवा करत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. सर्वपंथ समभाव मानतो. गोवा असो, पूर्वेकडचा भाग असो, आपले ख्रिश्चन लोक राहतात. त्या ठिकाणीही आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हा भारताच्या राजकीय इतिहासात आणि भारताच्या आघाडीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स एवढा यशस्वी कधी झाला नाही, तेवढा एनडीए झाला आहे, असं मोदी म्हणाले.