आजही तुडुंब गर्दी, मातोश्री बाहेर आले… हात जोडले आणि उद्धव ठाकरे म्हणाले…
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी अनेक राज्यात भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे निर्भेळ यश म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातही महायुतीला मोठा फटका बसला आहेत. मात्र महाविकासा आघाडीची चांगली कामगिरी झाली असून शिवसेना उबाठा गटाला ९ जागा मिळाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी अनेक राज्यात भाजपची पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे निर्भेळ यश म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातही महायुतीला मोठा फटका बसला आहेत. मात्र महाविकासा आघाडीची चांगली कामगिरी झाली असून शिवसेना उबाठा गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. मुंबईतही 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेने त्यांचा बालेकिल्ला राखला आहे.
काल जाहीर झालेल्या निकालानंतर शिवसैनिकांच्या हृदयात मानाते स्थान असलेल्या मातोश्रीव प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. तेच दृश्य आज सकाळीही दिसले.मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा मोठा जल्लोष पहायला मिळाला. ठाकरे गटाच्या ईशान्य मुंबईचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील हे विजयी झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मातोश्री बाहेर येऊन, सर्व कार्यकर्त्यांसमोर हात जोडून उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मी महाराष्ट्रभर दौरा करणार आहे , नाशिकला देखील येणार आहे, सर्वांचे आभार मानण्यासाठी, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. सर्व पदाधिकाऱी, कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली, माध्यमांशीदेखील त्यांनी संवाद साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
आपल्या कोणी हरवू शकत नाही हा त्यांचा (सत्ताधारी) गैरसमज होता. मात्र त्यांचा तो गैरसमत तुम्ही सगळ्यांनी दूर केला . आपण त्यांना हरवू शकतो, हे तुम्ही त्यांना दाखवून दिलं, असं म्हमत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली.
आता मी लवकरच नाशिकला येणार आहे. मी सर्वांचे आभार मानण्यासाठी फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा दौरा करेन. मी तुम्हा सगळ्यांचा ऋणी आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमचा अभिनंदन करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या सहा जागांवरचा निकाल काय?
दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला.
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे.
मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे