Lok Sabha Election 2024 : राज ठाकरेंनी सभा घेतल्या त्या मतदारसंघात काय झालं?; महायुतीला फायदा की तोटा?

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि सिंधुदुर्गमध्येही महायुतीच्या उमेदवारांनी गड कायम राखल्याचे चित्र दिसत आहे. म

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरेंनी सभा घेतल्या त्या मतदारसंघात काय झालं?; महायुतीला फायदा की तोटा?
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 1:12 PM

लोकसभा निवडणूक 2024 चे कल हाती येत आहेत. या कलांनुसार भाजपप्रणित एनडीएकडे 291 जांगावर आघाडी आहे तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 233 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपच्या या कामगिरीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे देशभरातील आकडे समोर येत असतानाच महाराष्ट्रातील चित्रही स्पष्ट होत आहे. राज्यातील महत्वाच्या जागांवर महायुतीचे अनेक उमेदवार आघाडीवर दिसत असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि सिंधुदुर्गमध्येही महायुतीच्या उमेदवारांनी गड कायम राखल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या या उमेदवारांच्या कामगिरीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही वाटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला तारलं का अशी चर्चा सुरू आहे.

मनसेने महायुतीमध्ये सामील व्हावे यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बरेच दिवस प्रयत्न सुरू होते. त्यासंदर्भात राज ठाकरे यांची दिल्लीत अमित शाहांशी भेटही झाली. मात्र त्यांची चर्चा निष्फळ ठरली आणि राज ठाकरे यांनी महायुतीत सामील न होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुतीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. “देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाष्ट्रसैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली. “या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी युतीला तारलं  ?

पाठिंब्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यात ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कल्याण डोंबिवली, पुणे आणि सिंधुदुर्ग येथे जाहीर सभा घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही महायुतीच्या उमेदवारासांठी जीवाच रान करूम प्रचार केला होता. आजच्या निकालांमध्ये या तिनही जागांवर महायुतीचे उमेदवार अनुक्रम श्रीकांत शिंदे, मुरलीधर मोहोळ आणि सिधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा, बिनशर्त पाठिंब्याचा महायुतील प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्य फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

श्रीकांत शिंदे यांची विक्रमी आघाडी

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा श्रीकांत शिंदे यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून विक्रमी आघाडीवर असून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या पिछाडीवर आहेत.

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र फुटीनंतर शिवसेनेतच दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. ही लढाई अटीतटीची होईल असा अंदाज दिसत होता मात्र मतमोजणी सुरू झाल्यापासूनच श्रीकांत शिंदे यांनी मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. त्यांची घोडदौड अद्यापही सुरूच आहे. सध्या ते १ लाखांपेक्षाही जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.