Nagpur Election Final Result 2024 : नागपूरच्या गडकरींनी ठाकरेंना हरवलं; विजयाची हॅटट्रिक…
Nagpaur Lok Sabha Election Results 2024 News in Marathi : देशाच्या केंद्रस्थान म्हणून ख्याती असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत. तर, पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विकास ठाकरे यांनी त्यांना कडवी झुंज दिली आहे.

विदर्भातील प्रतिष्ठेच्या असलेल्या नागपूर मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच नितीन गडकरी आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर ठाकरे यांनी सहा हजार मतांची आघाडी घेऊन धाकधूक वाढविली होती. पण, त्यानंतर गडकरी यांनी ही आघाडी मोडून काढत विजय संपादन केला.
कोण आहेत विकास ठाकरे ?
नितीन गडकरी यांच्या विरोधात कॉंग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. विकास ठाकरे हे पश्चिम नागपुर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2002 च्या महापालिका निवडणुकीत ते विजयी झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्याकडे नागपूरचे महापौरपद चालून आले. तर, 2007 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. 2009 मध्ये त्यांनी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा निवडणुक लढविली. पण, त्यांचा पराभव झाला. गेल्या दहा वर्षांपासून आ. ठाकरे हे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
नागपूरात किती टक्के मतदान झाले?
नागपुरमध्ये एकूण 54.33 टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात 22 लाख 23 हजार 281 मतदार आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 12 लाख 07 हजार 344 जणांनी मतदान केले होते. घातलेल्या मतदानाचा नेमका फायदा कुणाला झाला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स