ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासाचा रोड मॅप मांडतानाच विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षाही केली. नव्या संसदेत विरोधक सहकार्य करतील, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ
PM Narendra ModiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 3:40 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना अलर्ट केलं आहे. तुम्ही विकासाची कामे करा. चांगली कामे करा. देशाची प्रगती करा. केवळ ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, असा सावधानतेचा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तर देशातील जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे विरोधक देश भावनेने सभागृहात येतील. चांगली डिबेट करतील. देशाच्या विकासात मदत करतील. विरोधक हे आमचे विरोधक असू शकतात. पण देशाचे नाही. तेही या देशाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी खासदारांना संबोधित केलं. खासदारांना संबोधित करताना मोदींना निवडणूक निकालाचं विश्लेषण करतानाच देशाच्या विकासाचा रोड मॅपही मांडला. आपण 10 वर्षात जो विकास केला तो फक्त ट्रेलर आहे. ते माझं निवडणुकीचं भाषण नव्हतं. आपल्याला वेगाने विकास करायचा आहे. आपणच आपलं रेकॉर्ड तोडावं असं जनतेला वाटत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वन पॉइंट अजेंडा नाकारला

नरेंद्र मोदी यांनी यावेळी एनडीएचा अर्थही सांगितला. एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हल्प इंडिया, ॲस्पिरेशनल इंडिया. हेच स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे रोड मॅप आहे. आपण नेहमी करप्शन फ्री सरकार दिलं आहे. संधी मिळताच आपण काम केलं आहे. काँग्रेस नेतृत्वातील यूपीएने नाव आता बदललं आहे. पण त्यांची ओळख घोटाळ्यांची आहे. नाव बदलल्यानंतरही देश त्यांच्या घोटाळ्याला विसरला नाही. त्यांना नाकारलं आहे. इंडिया आघाडीने एका व्यक्तीचा विरोध करण्यासाठी वन पॉइंट अजेंडा राबवला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना पुन्हा विरोधात बसवलं आहे. एनडीए विकसीत भारताची संकल्पना घेऊन निवडणुकीला सामोरे गेला होता, असं मोदी म्हणाले.

तो चांगला संकेत

देशातील जनतेचा एनडीएवर अतुट विश्वास आणि भरवसा आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा वाढणार हे स्वाभाविक आहे. मी ही गोष्ट चांगला संकेत मानतो. मी आधीच सांगितलं होतं की, मागच्या दहा वर्षातील काम हे फक्त एक ट्रेलर आहे. ही माझी कमिटमेंट आहे. आपल्याला अजून वेगाने आणि विश्वासाने पुढे जायचं आहे. देशाच्या आकांक्षापूर्ण करण्यासाठी एक क्षणही विलंब करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.

10 वर्षात 100चा आकडा गाठला नाही

यावेळी मोदींनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात 100 चा आकडा गाठला नाही. गेल्या तीन निवडणुकीतील काँग्रेसची आकडेवारी एकत्र केली तरी त्यापेक्षा जास्त सीट आपण जिंकल्या आहेत, असा चिमटाच त्यांनी काढला. आम्हाला विजय पचवता येतो. विजयाचा उन्माद करायचा नाही आणि पराभूतांचा उपहास करायचा नाही ही आपली संस्कृती आहे. आपण हरलो नव्हतो आणि हरलो नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.