पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा; राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणूकांत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजपाने सरकार स्थापणेसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची सोबत लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा; राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना भेटले
pm modi with rashtrapati droupadi murmu
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 2:30 PM

लोकसभा निवडणूकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे आता सरकार स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतू नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला एकट्याला बहुमताचा 272 हा जादुई आकडा काही पार करता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापण करण्यासाठी नरेंद्र मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूची गरज लागणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी 17 लोकसभेची मुदत संपत असून त्यासाठी नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रभवन गाठले आहे. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरु झाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चारसो पारचा नारा दिला खरा परंतू नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला आता अब की बार आघाडी सरकार स्थापन करावे लागणार आहे. साल 2014 आणि 2019 मध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत मिळाले होते. परंतू साल 2024 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाले नसल्याने मोदी यांना आता मित्र पक्षांच्या मर्जीवर सरकार चालवावे लागणार आहे. नरेंद्र मोदी यांनी कालच एनडीएच्या घटक पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत. आज 17 व्या लोकसभेची मुदत संपत असल्याने नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत, तेथे त्यांनी आपल्या   पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागतील असे म्हटले जात आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला बहुमत स्थापन करण्यासाठी बोलावतील त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल असे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी

येत्या 8 तारखेला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या 8 जूनला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. येत्या 8 जूनला रात्री 8 वाजता हा शपथ सोहळा होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.