Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस… नरेंद्र मोदींनी केलं एनडीएच्या जुन्या नेत्यांचं स्मरण; काय म्हणाले?

दहा वर्षात विकास करणार. गुड गव्हर्न्स देणार. मध्यम वर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या जीवानातील सरकारचा हस्तक्षेप जेवढा कमी होईल, तेवढी लोकशाही मजबूत होईल असं माझं मत आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपण सहजपणे ते करू शकतो. आपल्याला बदल हवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra Modi : बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस... नरेंद्र मोदींनी केलं एनडीएच्या जुन्या नेत्यांचं स्मरण; काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 2:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मोदी यांच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज संसदेच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी खासदारांना आणि देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशाच्या विकासाचा रोडमॅप मांडला. देश कसा विकास करेल याची रुपरेखा मांडली. त्याचवेळी एनडीएच्या यशाची मिमांसा करतानाच एनडीएच्या गेल्या 30 वर्षातील सर्व नेत्यांचं स्मरण केलं. यावेळी मोदींनी शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण केलं.

एनडीए ही लोकांची भाऊ गर्दी नाही. आम्ही राष्ट्राशी समर्पित आहोत. राष्ट्राशी समर्पित असणाऱ्या लोकांचा हा समूह आहे. गेल्या 30 वर्षाचा हा कालखंड आहे. देशातील राजकीय व्यवस्थेतील ही सर्वात मोठी आणि जुनी ऑर्गेनिक अलायन्स आहे. मूल्य सांभाळणारी ही अलायन्स आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, प्रकाश सिंह बादल. शरद यादव अशी अगणित नावे आहेत. या लोकांनी जे बीज लावलं होतं. आज भारताच्या जनतेने विश्वासाचं सिंचन करून त्याचा वटवृक्ष केलं आहे. आपल्याकडे या महान नेत्यांचा वारसा आहे. आपल्याला त्याचा अभिमान आहे. आपण एनडीएच्या त्या मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गुड गव्हर्नन्स म्हणजे एनडीए

हे सुद्धा वाचा

गुड गव्हर्नन्स ही आमच्यातील कॉमन गोष्ट आहे. आम्ही गुड गव्हर्नन्स दिलं आहे. एनडीए म्हटल्यावर गुड गुड गव्हर्नन्स हा पर्यायी शब्द होतो. मी गुजरातमधून आलो. नीतीश कुमार बिहारमधून आले. चंद्राबाबू आंध्रप्रदेशातून आले, आम्ही कुठूनही आलो असेल, पण आमच्या सर्वात गरीबांचे कल्याण हे सर्वोच्च राहिलं आहे. देशाने एनडीएच्या गरीब कल्याण्याच्या गुड गव्हर्न्सच्या दहा वर्षाला पाहिलं आहे. देश ही दहा वर्ष जगला आहे, असं मी सांगू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

आपला, परका कोणी नाही

सभागृहात कोणत्याही पक्षाचा कोणीही लोकप्रतिनिधी असेल तर तो माझ्यासाठी सर्व समान आहे. लोकसभा असो की राज्यसभेचा सदस्य असो आमच्यासाठी सर्व समान आहेत. त्यामुळेच एनडीए 30 वर्षापासून मजबुतीने पुढे गेला आहे. आपला परका कोणी नाही. सर्वांना आम्ही जवळ घेतलं आहे. आम्ही 2024मध्ये या टीम भावनेने काम केलं आणि ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केलं, त्यामध्येच आपल्याला आर्गेनिक अलायन्सचं सामर्थ्य दिलं आहे. एक दुसऱ्यांची मदत केली आहे. जिथे कमी तिथे आम्ही हाच विचार आम्ही केला. काही कमी असेल तर मी येईल, काही कमी पडू देणार नाही. जिथे कमी तिथे आम्ही असं कार्यकर्ते जगले. त्यामुळे तर विजय मिळाला, असं मोदी म्हणाले.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.