Narendra Modi : ते आधी हळूहळू बुडत होते, आता वेगाने बुडणार ; मोदींचा रोख कुणाकडे ?

2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लागवला.

Narendra Modi : ते आधी हळूहळू बुडत होते, आता वेगाने बुडणार ; मोदींचा रोख कुणाकडे ?
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 2:25 PM

इंडिया आघाडीचे लोक आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या विरोधातील आहेत. ते जगात भारताची लोकशाही कमी लेखण्याचं काम करत आहेत. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचं मी जगभरात सांगतोय आणि हे तिकडे लोकशाही बदनाम करायचं काम करत आहेत. हा चहावाला गडबड करून आलाय असं सांगत आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. 2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लागवला. आज नरेंद्र मोदी यांची सर्वमताने एनडीएच्या नेतेपदी निवड झाली.

1 तारखेला मतदान झाला. 4 तारखेला काऊंटिंग झालं. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी पाहा. या काळात देशात हिंसा घडवण्याची भाषा केली जात होती. काही लोक गंभीरतेने घेत नाहीत. निकाल आल्यावर देशात आग लागेल अशा पद्धतीने काम केलं. देशातील लोकांना विभागण्याचं काम केलं. लोकांना तोडण्याचं काम केलं. देशात फूट पाडण्याचं काम केलं, असा आरोप मोदी यांनी केला.

पराजित लोकांचा उपहास करण्याची आपली संस्कृती नाही

हे सुद्धा वाचा

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे निकाल एनडीएचा महाविजय आहे, हेच लोक सांगतील. जगही हे मान्य करेल. पण आम्ही हरलोय, गेलोय अशा पद्धतीने दोन दिवस सुरू होतं. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल हाय करायचं होतं. काल्पनिक गोष्टी सांगाव्या लागल्या. आघाडीच्या इतिहासात आकडे पाहता हे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे. पण प्रयत्न असा केला की विजयच स्वीकारायचा नाही. पराजायत ठेवायचा. अशा गोष्टींचा बालमृत्यू होतो, झाला. पण देशाला माहीत आहे. आम्ही हरलो नव्हतो आणि हरलो नाही. पण 4 तारखेला जी वागणूक राहिली आहे. आपण विजय पचवू शकतो हे आपण दाखवून दिलं. आपले संस्कार असे आहेत. विजयाच्या उन्माद करू नये, पराजित लोकांचा उपहास करण्याची आपली संस्कृती नाही. आपण विजय पचवतो. हे आपले संस्कार आहेत, असे मोदी म्हणाले.

हे तर लहान मूलंही सांगेल

लोकसभेपूर्वी सरकार कुणाचं होतं. 2024 निकालानंतर कुणाचं सरकार बनलं तर लहान मूलही सांगेल एनडीएचं सरकार होतं. मग हारलो कसं? असा सवाल मोदींनी विचारला. पूर्वीही एनडीए होती आणि आताही आहे. दहा वर्षानंतरही काँग्रेसला १००चा आकडा गाठता आला नाही. 2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.