भाजपच्या राम सातपुतेंना पराभूत करत प्रणिती शिंदे यांनी रचला इतिहास, अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या महिला खासदार
Solapur Lok Sabha Election Final Result 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव करत इतिहास रचला आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाला समोर आला आहे. भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आमनेसामने होते. प्रणिती शिंदे यांनी लढतीमध्ये विजय मिळवला आहे. राम सातपुतेंचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी इतिहास रचला आहे. सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेल्य प्रणिती शिंदे यांनी अखेर 74, 814 मतांनी विजय मिळवलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांच्या कन्या प्रणिती शिंदे या पहिल्याच महिला खासदार बनल्या आहेत.
प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. प्रणिती शिंदे यांचा 74, 814 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ईव्हीएममध्ये 74197 मते तर पोस्टल मध्ये 617 मतांची आघाडी होती. तर प्रणिती शिंदे यांना एकूण 6,20,225 मते, भाजपच्या राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळाली आहेत. पोस्टल मतदानात प्रणिती शिंदे यांना 617 मते मिळाली आहेत.
सोलापूर हा मतदार संघ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. 1998 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून गेले. 2003 मध्ये त्यांना लोकसभेची टर्म पूर्ण होण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांना भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
2009 च्या निवडणुकीत स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी विजय मिळविला. 1998 ते 2009 या काळात त्यांनी सोलापूरमधून विजय खेचून आणला होता. 2014 मध्ये मात्र या विजयी परंपरेला छेद मिळाला. देशात मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे निवडून आले. नंतर 2019 च्या निवडणुकीतही शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला होता.
दरम्यान, सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदा 2024 च्या निवडणुकीत त्यांची आमदार कन्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांचा पराभवाचा बदला घेतलाय. त्यासोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार बनल्या आहेत.