पवार कुटुंबात कायमची फूट? रोहित पवार यांच्या आईचं खळबळजनक विधान काय ?

लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीच्या लढतीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आणि सुरू झालं आरोप-प्रत्यारोपांच राजकारण. लोकसभा निवडणूकीची घोषणा होताच अजित पवार यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार उभं करणार असल्याचं जाहीर केलं.

पवार कुटुंबात कायमची फूट? रोहित पवार यांच्या आईचं खळबळजनक विधान काय ?
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 10:45 AM

पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, 70 टक्के कुटूंब एका बाजूला तर एक कुटूंब एका बाजूला आहे. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं धक्कादायक विधान पवार कुटुंबातील सून आणि आमदार रोहित पवार यांची आई, सुनंदा पवार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीच्या लढतीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आणि सुरू झालं आरोप-प्रत्यारोपांच राजकारण. लोकसभा निवडणूकीची घोषणा होताच अजित पवार यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार उभं करणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. पवार वि. पवार असा सामना रंगलेल्या बारामतीमध्ये निवडणुकीसाठी अक्षरश: घमासान युद्ध सुरू झालं. अजित पवार वि संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र दिसलं. यावेळी अजित पवारांनी अनेक आरोपही केले.

मात्र बारामती निवडणुकीत विजय झाला तो सुप्रिया सुळे यांचाच. तय्यांनी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने हरवलं. झालं गेलं गंगेला मिळालं अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतल्यामुळे आता पवार कुटुंबातील दरी सांधली जाईल का, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घोळू लागले आहेत. मात्र आमदार रोहित पवारांची आई आणि पवार कुटुंबातील सून, सुनंदा पवार यांच्या बोलण्यावरून हे सध्या तरी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय म्हणाल्या सुनंदा पवार ?

खरंतर इलेक्शनची जेव्हा घोषणा झाली आणि बारामतीमधील उमेदवाराची जेव्हा घोषणा झाली, त्याच्याआधीपासूनच आमचं कुटुंब खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलं आहे. त्यामुळे विलक्षण तणाव होता. पण निवडणुकीला सामोरं जायचं होतं. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही ठरवलं होतं की ( शरद पवार) साहेबांच्या सोबत रहायचं. 70 टक्के कुटूंब साहेबांसोबत आहे आणि वैचारिक भूमिका बदलल्यामुळे एक कुटुंब बाजूला गेलं आहे.

एरवी सण-समारंभाला एकत्र येणं ठीक आहे पण आता वैचारिक मतभेद एवढे झाले आहेत, मन एवढी दुखावली आहेत, भाषेचा स्तर खूप खाली गेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं त्या म्हणाल्या.

रोहित पवारांवर आता पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. रोहित ती नक्कीच पार पाडतील सा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.