मि. फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत – संजय राऊत कडाडले, Video
देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचं, कपटाचं राजकारण केलं. राजकीय सभ्यता, संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, फडणवीस यांनी त्याचा नाश करण्याचं काम केलं. अशी टीका संजय राऊत यांनी केली.
ज्या पद्धतीचं दळभद्री, सुडाचं, कपटाचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राजकीय सभ्यता, संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, फडणवीस यांनी त्याचा नाश करण्याचं काम केलं. पेशवेकालामध्ये आनंदी बाई होत्या, तसं ( फडणवीस) हे महाराष्ट्राच्या राजकारणातली ( पुरुष) आनंदी बाई आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. मि. फडणवीस, जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली असेही राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधतान संजय राऊत यांनी फडणवीसांवर कडाडून हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक
ही कटुता आमच्या मनात आहे, त्याला कारण ते स्वत: आहेत. महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण कधीच नव्हतं, ते फडणवीस यांनी सुरू केलं. त्याचा बदला जनतेने या लोकसभा निवडणुकीत घेतला. तुमचं हे सुडाचं, बदल्याचं फडतूस राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हे लोकांनी फडणवीस यांना दाखवून दिलं. या महाराष्ट्रामधली एक पिढी खतम करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. हातातली सत्ता, त्याचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी, राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी वापरला, असं राऊत म्हणाले. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तींना घरी बोलावून दम देण्यात आला, हे काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केलं, असा आरोपही राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत, असे टीकास्त्रस त्यांनी सोडलं.
राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलंय
या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोचं. लोकांचा जेवढा मोदी-शहांवर राग नाही, तेवढा फडणवीसांवर आहे. विदर्भात काय झालं पहा ना, विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली, तर भाजपा हा रसातळाला गेला, याला जबाबादार फडणवीस आहेत. ते राजीनामा कसला देतायत, लोकांनीच त्यांना घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जे जातीचं, धर्माचं, सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक चांगलं राज्य रसाताळाला नेलं, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.
आमच्यावर कारवा करण्यापेक्षा, लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय ते आधी बघा, असा सल्लाही राऊत यांनी दिला. भविष्यात कारवाया आम्हालाही करता येतील, एवढे पुरावे आमच्याकडेही आहेत, असा सज्जड इशारा राऊतांनी दिला. कालपर्यंत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन असं म्हणत होतात. जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली हे विसरू नका, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र डागलं.