Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाराष्ट्र आणि यूपीसह 5 राज्यांनी नरेंद्र मोदींना रोखलं
NDAचा विचार केला तर भाजपच्या अवघ्या 34 जागा निवडून आल्यात. आरएलडीचे 2 खासदार अपना दलचा एक खासदार, असे एकूण NDAचे फक्त 37 खासदार जिंकलेत. 2019मध्ये यूपीत एकट्या भाजपलाच 62 जागा आणि अपना दलला 2 जागा मिळाल्या होत्या. NDAचे 64 खासदर होते. म्हणजे आताच्या निकालात NDAचं 27 जागांचं नुकसान झालंय. आझाद समाज पार्टीचे रावण अर्थात चंद्रशेखर आझाद नगीना सीटवरुन विजयी झालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला धोबीपछाड दिलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 17 जागा तर महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळालाय. महाविकास आघाडीतचा विचार केला तर, काँग्रेस 12, ठाकरे गट 11 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्यात.
महायुतीत भाजपला 12 जागा शिंदेंची शिवसेना 4 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा मिळालीय. देशपातळीवर भाजपला रोखणारं तिसरं राज्य म्हणजे, पश्चिम बंगाल. इथं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी कमाल केलीय. तृणमूल काँग्रेसनं 29 जागा जिंकल्यात. 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच 7 जागांचा फायदा तृणमूलला झाला तर भाजप 18 वरुन 12 वर आली. इथं भाजपला 6 जागांचा फटका बसला. गेल्या वेळी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला एक जागा मिळाली.
मोदींना ब्रेक लावणारं चौथं राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थानमध्ये भाजपला 14 जागा मिळाल्यात. NDAचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा मिळालीय. 2019 मध्ये भाजपला 24 आणि NDAचा घटक पक्षत असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा. अशा 25 पैकी 25 जागा NDAनं जिंकल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसनं 8 जागा जिंकल्यात. एक जागा कम्युनिस्ट आणि एक जागा भारत आदिवासी पार्टीला मिळालीय. म्हणजेच NDAला 10 जागांचं नुकसान झालंय. मोदींना काँग्रेसनं कर्नाटकातही चांगलाच झटका दिला. भाजपला कर्नाटकात 28 जागांपैकी 17 जागांवर विजय मिळालाय. तर NDAचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचे 2 खासदार आलेत.
पाहा व्हिडीओ:-
काँग्रेसचे 9 खासदार विजयी झालेत. 2019 मध्ये भाजपनं 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला 8 जागांचं नुकसान झालंय. 400 पारचा नारा घेवून मोदी ब्रिगेड मैदानात उतरली होती. पण यूपी, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि कर्नाटकातल्या जनतेनं विरोधकांना साथ दिल्यानं. विशेषत: यूपीत अखिलेश यादव आणि राहुल गांधींच्या झंझावातामुळं मोदींना मोठा झटका बसला.