Explainer : उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र तर दिल्लीत शरद पवार, काय आहे इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या जागी भाजपला बेशरम जनता पार्टी असे संबोधणारे उद्धव ठाकरे हेच प्रमुख विरोधी चेहरा असतील. दुसरीकडे भाजप विरोधातील इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असणारे शरद पवार हे दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसतील.

Explainer : उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र तर दिल्लीत शरद पवार, काय आहे इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला
Sharad Pawar, Uddhav Thackeray and Pm Narendra ModiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 7:54 PM

2019 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपपासून तोडून आघाडीत आणण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचा मोठा सहभाग होता. त्यावेळेपासून आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)  होईपर्यंत पवार यांनी भाजप विरोधी आघाडीचे प्रमुख निर्णयकर्त्याची महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याचवेळी पवार यांनी पक्ष फुटल्यानंतरही राज्यात आपला जनाधारही मजबूत केला आहे. बारामतीच्या बालेकिल्ल्यात कौटुंबिक कलहात कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना त्यांनी विजय मिळवून दिला. परिस्थिती कशीही असो परंतु त्या परिस्थितीला कलाटणी देण्याचे बळ असणारे लढवय्या आहे हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबतीने आणखी एक योद्धा उभा राहिला ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. नुकत्याच लागलेल्या निवडणुका निकालाने उद्धव हे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यापेक्षा कमी नाहीत हे सिद्ध झाले आहे.

महाराष्ट्रात इंडिया आघाडीने लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी पक्षाला 9 जागा जिंकल्या. 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पक्षात फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 5 तर शरद पवार यांच्याकडे 3 खासदार होते. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढविल्या. त्या तुलनेत त्यांना कमी यश मिळाले असले तरी प्रतिकूल परिस्थितीत 9 जागा निवडून आणण्याचे कसब त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी निकाल संमिश्र लागला असला तरी हातातून सारे काही गेले असताना त्यांनी हे यश संपादन केले हे मान्य करावेच लागेल.

मुस्लिम, दलित मतदारांना जोडण्यात यश

उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मूलभूत विचारांपासून दूर गेल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. पण, त्याचा तो आरोप अद्याप खरा ठरलेला नाही. भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असलेले सर्वात जुने संबंध तोडूनही ठाकरे यांनी राज्यावर आपली पकड कायम ठेवली. लोकसभा निवडणूक प्रचारात प्रमुख भागीदार म्हणून त्यांची भूमिका लक्षणीय होती. त्यामुळेच ठाकरे यांचे लक्ष आता ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पर्यायाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीला ते आतापासूनच लागले आहेत. याचे कारण म्हणजे, शिवसेनेचे मूळ मराठी मतदार हे ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत. त्यासोबतच ठाकरे यांनी मुस्लिम आणि दलित मतदारांना आपल्याबाजूने वळविण्यात यश मिळवले आहे. लोकसभेच्या निकालांवरून असेही दिसून आले आहे की महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये मतांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात तीव्र सत्ताविरोधी लाटेत शेतकरी, नैसर्गिक संकट, बेरोजगारी, महागाई हे विषय घेऊन ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मिशन मोडमध्ये असतील.

सर्वाधिक फटका बसविणारा प्रमुख विरोधी चेहरा

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. भाजपने 2014 मध्ये 122 आणि 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या. सलग दोन निवडणुकांमध्ये 100 पेक्षा जास्त जागा जिंकणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. मात्र, दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप युती होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे भाजप विरोधातील राज्यातील सर्वात मोठा चेहरा म्हणून पुढे आले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याशी त्यांचे कटू संबंध निर्माण झाले. कोणत्याही परिस्थितीत ते आता भाजपसोबत तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे ठाणे आणि जळगाव जिल्हा वगळता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यभरात मोठा धक्का बसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात सर्वाधिक फटका बसविणारा प्रमुख विरोधी चेहरा उद्धव ठाकरे हेच असतील.

उद्धव ठाकरे महाराष्ट्रात तर दिल्लीत शरद पवार

लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीने ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पक्षाने मुंबईत चार जागा लढविल्या. त्यापैकी तीन जागा जिंकल्या. 1.60 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ठाकरे नावाची एक शक्ती अजूनही आहे हे यावरून स्पष्ट झाले. या निकालानंतर पक्ष सोडून गेलेले काही पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेले आमदार, खासदार यांना आपले दरवाजे बंद असतील असे म्हटले आहे. परंतु, काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पक्षात पुन्हा संधी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या जागी भाजपला बेशरम जनता पार्टी असे संबोधणारे उद्धव ठाकरे हेच भाजपचे प्रमुख विरोधी चेहरा असतील. दुसरीकडे भाजप विरोधातील इंडिया आघाडीतील प्रमुख चेहरा असणारे शरद पवार हे दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसतील. त्याची सुरवात शरद पवार यांनी निकाल लागल्याच्या दिवसापासूनच केली आहे. इंडिया आघाडीने देशात कमालीची सुधारणा केली. त्यामुळे पवार पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व येण्याची शक्यता दिसून येते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.