ठाकरेंना कुणाचा पाठिंबा, भाजपपासून कुणाची फारकत? निवडणुकीची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या जागा जिंकून आल्या त्यावरून भाजपने ठाकरे गटावर टीका करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे गटाला मुस्लिमांची मते मिळाल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजपच्या या आरोपात किती सत्यता आहे याचा घेतलेला हा आढावा.

ठाकरेंना कुणाचा पाठिंबा, भाजपपासून कुणाची फारकत? निवडणुकीची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी
uddhav thackeray and devendra fadnavis (1)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 10:55 PM

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोलने जे अंदाज व्यक्त केले होते ते फोल ठरवत प्रत्यक्षातील निकाल वेगळेच लागले. महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या जागा जिंकून आल्या त्यावरून भाजपने ठाकरे गटावर टीका करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे गटाला मुस्लिमांची मते मिळाल्याचा आरोप भाजप करत आहे. ज्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नेहमी निवडणुका लढविल्या. मात्र, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून मुस्लिमांचा पाठींबा घेतल्याची टीकाही आता भाजपकडून होत आहे. भाजपच्या या आरोपात किती सत्यता आहे याचा घेतलेला हा आढावा.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लीम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने उद्धव सेनेला मतदान केले. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळाल्या. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मुस्लीम मतदार ठाकरे यांच्यासोबत आल्याची टीका भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवसेना एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे मुस्लिम समाजाने शिवसेनेपासून नेहमी अंतर राखले होते. मात्र, आता हे समीकरण बदलले आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली स्थापन झालेल्या शिवसेनेला मुस्लिमांनी मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी उत्तर भारतीयदेखील भाजपपासून दुरावले आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. उद्धव यांच्या नव्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. भाजपच्या या आरोपात किती तथ्य आहे याचा पुरावाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने समोर आला आहे. भायखळा, मुंबादेवी, शिवाजी नगर, मानखुर्द, अणुशक्ती नगर, कुर्ला, चांदिवली, घाटकोपर पश्चिम, मालाड मालवणी या मुस्लिम बहुल भागातील मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने उद्धव यांच्या उमेदवारांना मतदान केले आहे.

अरविंद सावंत यांच्या विजयाचा मार्ग ठरले मुस्लिमबहुल भायखळा, मुंबादेवी

दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांनी मोठी भूमिका बजावली आहे. अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव निवडणूक लढवत होत्या. अरविंद सावंत हे या निवडणुकीत 52,673 मतांनी विजयी झाले. सावंत यांच्या विजयामध्ये भायखळा, मुंबादेवी परिसरातील मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. यामिनी जाधव या ज्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत येथील मुस्लिम आपल्या पाठीशी असल्याच्या भ्रमात होत्या. मात्र त्याच भायखळ्यात अरविंद सावंत यांना 86,883 मते मिळाली तर जाधव यांना 40,813 मते मिळाली. म्हणजे सावंत आणि जाधव यांच्यात तब्बल 46,070 मतांचा फरक होता. तर, मुस्लिमबहुल मुंबादेवी विधानसभेतून अरविंद सावंत यांना 77,469 मते मिळाली. यामिनी जाधव यांना केवळ 36,690 मते मिळाली. काँग्रेस आमदार अमीन पटेल मुंबादेवी विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. या दोन्ही मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना विजयाची हॅट्ट्रिक करण्यात मदत झाली.

धारावी, अणुशक्ती नगरने राहुल शेवाळे यांना रोखले

दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा खासदार असलेले शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी विकेट घेतली. मात्र, शेवाळे यांची विकेट घेण्यामद्ये अणुशक्ती नगर विधानसभेचा मोठा वाटा आहे. अणुशक्ती नगरमधून अनिल देसाई यांना 79,767 आणि राहुल शेवाळे यांना 50,684 मते मिळाली. दलित आणि मुस्लिम बहुल धारावी विधानसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना 76,677 तर शेवाळे यांना 39,520 मते मिळाली. देसाई यांनी शेवाळे यांचा 53 हजार 384 मतांनी पराभव केला.

संजय दिना पाटील यांच्या विजयात मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा

ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील 29,861 मतांनी विजयी झाले. त्यांच्याही विजयामध्ये मानखुर्द, शिवाजी नगर विधानसभेतील मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. संजय दिना पाटील यांना येथून तब्बल 1,16,072 मते मिळाली तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना केवळ 28,101 मते मिळाली. संजय पाटील आणि कोटेचा यांच्यात 87 हजार 971 मतांचा फरक होता. हाच विधानसभा मतदारसंघ संजय पाटील यांच्या विजयाचे कारण ठरला. घाटकोपर पश्चिम विधानसभेचे भाजपचे राम कदम आमदार आहेत. येथेही मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. या विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील हे 15,772 मतांनी आघाडीवर आहेत.

अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. रविंद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र. त्यांच्याच विधानसभेत अमोल किर्तीकर यांनी 83 हजार 401 मते घेतली. तर वायकर यांना 72 हजार 119 मते मिळाली. जोगेश्वरी हा देखील मुस्लिम बहुल मतदारसंघ मानला जातो.

काँग्रेसलाही मतदान केले

ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विजयामागे मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा 16,514 मतांनी पराभव केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुर्ला, चांदिवली, वांद्रे पूर्व आणि वांद्रा पश्चिम विधानसभा वर्षा गायकवाड यांच्यासाठी उपयुक्त ठरल्या. चांदिवली विधानसभेत वर्षा यांना 1,02,985 तर निकम यांना 98,661 मते मिळाली. कुर्ला विधानसभेत वर्षा यांना 82,117 तर निकम यांना 58,553 मते मिळाली. विशेष म्हणजे कुर्ला मतदारसंघात शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर हे आमदार आहेत. वांद्रा पूर्व विधानसभेतही गायकवाड यांना 75,013 आणि निकम यांना 47,551 मते मिळाली. कलिना विधानसभेतही वर्षा यांना 67,620 तर निकम यांना 51,328 मते मिळाली. हे तिन्ही मतदारसंघ मुस्लीम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखले जातात.

उत्तर भारतीयांची भाजपकडे पाठ

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, यावेळी उत्तर भारतीय मतदार भाजपच्या मोहातून बाहेर पडताना दिसला. यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत केलेली युती कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकडे उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात वळले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना मतदान करण्यासाठीही उत्तर भारतीय मतदार बाहेर पडले. दिंडोशी, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही उत्तर भारतीय मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे मुस्लीम मतदार ठाकरे यांच्या बाजूने गेले त्याचप्रमाणे उत्तर भारतीय मतदारांचाही मोठा वर्ग उद्धव सेनेकडे गेल्याचे दिसून आले. एक प्रकारे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांकडून भाजपला हा इशाराच आहे असे म्हटले जाते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.