MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील निवडणुकीची चर्चा सुरु होती. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. राज्यात 4,136 उमेदवारांनी निवडणूक लढवली. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. मतदारांनी यंदा विक्रमी मतदान केले. यामुळे गेल्या 30 वर्षांचा विक्रम मोडला गेला. राज्यात जास्त झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला मिळाला? ते आज समोर येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात चार, धुळे जिल्ह्यात पाच, जळगाव जिल्ह्यात ११, नाशिक जिल्ह्यात १५ तर अहिल्यानगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे.
अहिल्यानगर विधानसभा मतदार संघाचा निकाल
एकूण जागा 12
कर्जत – जामखेडचा अंतिम निकाल अद्याप बाकी
संपूर्ण जिल्हा भगवामय
काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी (SP ) शून्य
सुहास कांदे यांचा ९० हजार मतांनी विजय झाला आहे.
पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते १५३४ मतांनी विजयी झाले आहे.
जळगाव शहर मतदार संघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचा रेकॉर्ड ब्रेक विक्रमी मतांनी विजय झाला आहे. तब्बल 70 हजार मतांनी सुरेश भोळे यांचा विजय झाला. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य मिळालं आहे.
कर्जत – जामखेड भाजपचे राम शिंदे 1404 मतांनी आघाडीवर आहे. या ठिकाणी रोहित पवार पिछाडीवर पडले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा संघात काँग्रेसचे हेमंत ओगले 13373 मतांनी विजयी झाले आहे.
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ विजयी झाले. 24 व्या फेरी अखेर 26 हजार 80 मतांची आघाडी घेतली होती. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 28 हजार 774 ने मताधिक्य कमी झाले.
नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे. देवयानी फरांदे 17800 मताधिक्याने निवडून आल्या आहे. हा मतदारसंघ माझ्यासाठी अवघड होता तरी देखील माझ्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवला, असे देवयानी फरांदे यांनी सांगितले.
कर्जत- जामखेड मतदारसंघात चुरशीची लढत सुरु आहे. 19 फेरीत भाजपचे राम शिंदे यांची 617 मतांची आघाडी घेतली. रोहित पवार पिछाडीवर आहे.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात २६ वी फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे ७५८६८मतांनी आघाडीवर आहे.
शिंदखेडा मतदारसंघात आमदार जयकुमार रावळ यांचा पाचव्यांदा ऐतिहासिक विजय झाला.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 23 फेरी अंती भाजप पक्षांचे डॉ विजयकुमार गावित हे मतांनी 67753 आघाडीवर आहे. डॉ विजयकुमार गावित (भाजपा) – यांना 135999 तर किरण तडवी ( कॉग्रेस ) यांना 68238 मते मिळाली आहे.
धुळे ग्रामीण मतदार संघातील भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाणे 23 वी फेरीअंती 56 हजार 866 मतांनी आघाडीवर आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांचा जवळपास 5000 मतांनी विजय झाला आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात अठराव्या फेरी अंती महाविकास आघाडीचे हेमंत ओगले 10671 मतांनी आघाडी घेतली आहे.
इगतपुरीमधून आमदार हिरामण खोसकर यांच्या मताधिक्यात सतराव्या फेरीतही मोठी वाढ हिरामण खोसकर यांनी घेतली 63 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघ अठराव्या फेरी अखेर आघाडीवर आहे. अनिल पाटील 23182 मतांनी आघाडीवर आहे.
दहाव्या फेरी अखेर भाजपचे अनुप अग्रवाल 34 हजार 565 मतांनी आघाडीवर आहे.
धुळे ग्रामीण मतदार संघातील भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाणे चौदावी फेरीअंती 35 हजार 765 मतांनी आघाडीवर आहे.
जामनेर विधानसभा मतदार संघात मंत्री गिरीश महाजन आघाडीवर आहेत. 19 हजार 374 मतांनी ते आघाडीवर आहे. आता केवळ दहा फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. मंत्री गिरीश महाजन विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
सहावी फेरीअंती काँग्रेसचे के.सी. पाडवी आघाडीवर आहे. ही आघाडी केवळ 97 मतांची आहे.
शिंदखेडामधून भाजपचे उमेदवार जयकुमार रावल 8 व्या फेरीअंती 32601 मतांची आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानी शिंदखेडा येथे जल्लोष सुरु केला आहे.
भुसावळ मतदार संघात 11 व्या फेरी अखेर आमदार संजय सावकारे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी 9249 मतांची आघाडी घेतली आहे.
धुळे ग्रामीणचे भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाणे आठवी फेरी अखेर आघाडीवर आहे. त्यांनी 23 हजार 326 मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे कुणाल पाटील पिछाडीवर आहे.
जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू केला आहे. मंत्री गिरीश महाजन आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला
भाजप उमेदवार जयकुमार रावल यांना पाचव्या फेरीअंती 22 हजार 826 मतांची आघाडी
पाचोरा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील सहाव्या फेरीतही 7721 मतांनी आघाडीवर आहे. पाचोरा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांची आघाडी कायम आहे.
सहावी फेरी फेरीत छगन भुजबळ 7900 मतांनी आघाडीवर आहेत. माणिकराव शिंदे पिछाडीवर आहेत.
देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांची घोडदौड सुरू आहे.
सरोज अहिरे यांनी १६१२५ मतांची आघाडी घेतली आहे.
नगर शहर मतदार संघात पाचव्या फेरी अखेरीस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 17715 मतांनी आघाडीवर आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहे.
जामनेरमधून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन 2887 मतांनी आघाडीवर आहे.
चौथ्या फेरीत छगन भुजबळ 3000 मतांनी आघाडीवर आहे. माणिकराव शिंदे पिछाडीवर गेले आहे. यापूर्वी झालेल्या फेरीत भुजबळ पिछाडीवर पडले होते. सुहास कांदे चौथ्या फेरी अखेर 19 हजारांच्या आघाडीवर आहे.
धुळे ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार राघवेंद्र भदाणे 5 हजार 248 मतांनी आघाडीवर आहे.
जामनेर मतदार संघात भाजपच्या संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप खोडपे आघाडीवर आहे.
दिंडोरी मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर नरहरी झिरवळ 1344 मतांनी आघाडीवर
पारनेर मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशिनाथ दाते 1612 मतांनी आघाडीवर आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणी लंके पिछाडीवर आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात तिसऱ्या फेरीत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर आहे. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहे.
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहिणी खडसे पिछाडीवर आहे. या ठिकाणी शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतली.
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर निवडणूक रिंगणात आहे.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयकुमार गावित 2000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर
छगन भुजबळ सलग दुसऱ्या फेरीत पिछाडीवर छगन भुजबळ 1300 मतांनी पिछाडीवर आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहे. ईव्हीएम मतमोजणीत राहुल ढिकले यांना चार हजारांची आघाडी आहे.
रावेर विधानसभा निवडणूक
धुळे शहर भाजपाचे अनुप अग्रवाल यांना पोस्टल मतदानात 600 मतांची आघाडीवर आहे.
नवापूर पहिली फेरीत काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांना 5059 मते मिळाली आहे. भरत गावित 1959
तर शरद गावित 2492 मते मिळाली आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघाचे महायुतीची उमेदवार किशोर पाटील पहिले फेरीनंतर 1240 मतांनी आघाडीवर
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे पहिल्या फेरी नंतर 1700 मतांनी आघाडी घेतली आहे.
चाळीसगाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर आहे. पहिली फेरी पूर्ण झाली आहे.
पहिल्या फेरीत भाजप उमेदवार काशीराम पावरा यांना 4139 मतांची आघाडी घेतली आहे.
चाळीसगाव विधानसभेतून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण 2200 मतांनी आघाडीवर आहे.
येवलात टपाली मतमोजणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना 100 मतांची आघाडी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे पिछाडीवर आहे.
शिंदखेडा मतदारसंघात आमदार जयकुमार रावळ यांची पहिल्या फेरीत 3 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यामान मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहा हजार मतांची आघाडी पहिल्या फेरीत घेतली आहे.
मालेगाव मध्यमध्ये समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद टपाल मतमोजणीत आघाडीवर आहे.
नाशिकमधील दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ आघाडीवर आहेत.
चाळीसगाव विधानसभेत पोस्टल मतमोजणीला विलंब होत आहे. अजूनही पोस्टल मतमोजणी सुरू झाली नाही. धुळे शहर मतदार संघात अत्यंत धिम्या गतीने पोस्टल मतमोजणी होत आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर पिछाडीवर आहे.
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे योगेश घोलप आघाडीवर, तर अजित पवार गटाच्या सरोज आहेर पिछाडीवर आहेत.
नाशिक पूर्व मध्ये भाजपचे राहुल ढिकले आघाडीवर आहे. सध्या पोस्टल मतांची मतमोजणी सुरु झाली आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतमोजणी शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांची आघाडी आहे. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे दुसऱ्या नंबरवर आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावर निरमा ग्रुपचे विमान दाखल झाले आहे. 6 सीटर खाजगी विमान अहमदाबादहून नाशिकमध्ये दाखल झाले आहे. विजयी उमेदवारांना नेण्यासाठी हे विमान आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक मध्य मतदार संघात भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे आघाडीवर आहे.
निफाडमध्ये टपाली मतमोजणीत अनिल कदम आघाडीवर, दिलीप बनकर पिछाडीवर आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर आहे.
येवल्यातून टपाली मतमोजणीत छगन भुजबळ आघाडीवर आहे. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे टपाली मोजणीत आघाडीवर आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बॅलेट पेपरची मतमोजणी होत आहे. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी सुरू होणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि माजी मंत्री के सी पाडवी यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरमिसळीनंतर कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या टेबलावर नियुक्ती केली आहे. पहिला टप्प्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मतपेट्यांमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतमोजणीचा कल अर्ध्या तासात येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. आता अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणारा मतमोजणी आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदगाव मतदार संघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी होणार आहे. शिवसेना ( शिंदे गट ) आ.सुहास कांदे, अपक्ष उमेदवार माजी खा. समीर भुजबळ, शिवसेना ( ठाकरे गट ) गणेश धात्रक, अपक्ष डॉ. रोहन बोरसे आदींमध्ये झालेली चौरंगी लढत आहे. हाय व्होल्टेज ड्रामामुळे नांदगाव मतदारसंघ चर्चेत आहे.
निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. चाळीसगाव विधानसभेतून मंगेश चव्हाण यांनी दुसऱ्यांदा भाजप महायुतीकडून निवडणूक लढवली.
निवडणूक कर्तव्यावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल झाली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर चिमुकल्या बाळासह आरोग्य सेविका कर्तव्यावर आली आहे. कडाक्याच्या थंडी भल्या पहाटे सात महिन्यांचे बाळ आरोग्य सेविका आईसह मतमोजणी केंद्रावर पोहचली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील मतमोजणीला अवघ्या काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. मतमोजणी सुरू होण्याअगोदर उमेदवार प्रतिनिधींची मतमोजणी सेंटरवर सोडले जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
नाशिक शहरातील मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकच्या मध्य,पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघात काटे की टक्कर असल्याने या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी उमेदवारांमध्ये झालेले राडे या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.
धुळे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी अवघ्या काही वेळात मत मोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधी निवडणूक यंत्रणेकडून सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्यात आली.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिदेंसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यात लढत आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. 14 टेबलांवर 24 फेऱ्यातून मतदानाचा कौल समजणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.