Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती
- मणिपूरमध्ये ३१ जागांवर आघाडी घेत भाजप एक नंबरचा पक्ष बनला
- जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती.
- सर्वसामान्य आणि वंचित घटकांतील मुलींना शिक्षणात आर्थिक पाठबळ, AIIMS आणि कौशल्य विद्यापीठ सारख्या तरतुदी , शेतकरी आणि मच्छीमारांसाठीच्या भरगोस आर्थिक मदत देणाऱ्या योजनांचा मणिपूरमध्ये भाजपाला फायदा झाला
- शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजना आणि तरतुदींची आश्वासने देत भाजपने पुन्हा एकदा मणिपूरच्या मतदारांचा विश्वास जिंकला आहे.
- मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्प्यात एकूण ६० जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडल्या.
- मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या व्होटिंग टक्केवारीत वाढ झाली आहे.
- भाजपने राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवली. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवली.
- मणिपूरमध्ये काँग्रेसने 54 जागी निवडणूक लढवली.
- बहुमत मिळण्यासाठी 31 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची आवश्यकता होती. भाजपाने ३१ हा जादुई आकडा गाठल्याने भाजपा पुन्हा मणिपूरमध्ये सत्ता स्थापण करेल.
- विधानसभेच्या दुस-या टप्प्यात 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं. 92 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
पंजाबमध्ये आपचा ‘झाडू’ फिरला, महाराष्ट्र आणि देशात किती संधी? जाणून घ्या टीव्ही 9 चा पोल
IPL 2022: धोनी महाराष्ट्राच्या मुलाला देतोय षटकार मारण्याचं खास ट्रेनिंग, हा मुलगा आयपीएल गाजवू शकतो, पहा VIDEO
Election Result 2022 Live: ही तर सुरुवात आहे, पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू: आदित्य ठाकरे
Non Stop LIVE Update