‘त्या’ चर्चांनंतर थेट ‘मातोश्री’ गाठली, बाहेर आल्यानंतर मिलिंद नार्वेकर सायलंट; प्रश्न विचारताच…

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हाही मिलिंद नार्वेकर मातोश्रीत होते. पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने ते मातोश्रीच्या बाहेर पडले. यावेळी त्यांना मीडियाने घेरलं. तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर हो सुद्धा म्हणाले नाहीत आणि नाही सुद्धा म्हणाले नाहीत.

'त्या' चर्चांनंतर थेट 'मातोश्री' गाठली, बाहेर आल्यानंतर मिलिंद नार्वेकर सायलंट; प्रश्न विचारताच...
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 4:29 PM

उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सकाळपासून रंगल्या आहेत. शिंदे गटाने मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लढण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी थेट मातोश्री गाठली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते बाहेर पडले. मातोश्रीतून बाहेर आल्यानंतर नार्वेकर शांत होते. फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे मातोश्रीत नेमकं काय घडलं? मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतून लढणार का? असे प्रश्न अनिर्णित राहिले आहेत.

मिलिंद नार्वेकर आज सकाळीच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे दुपारी मीडियाशी संवाद साधणार असल्याचा निरोप आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत उठलेल्या चर्चांशी संबंध जोडला गेला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा विषय वेगळाच निघाला. त्यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटिशीवर भाष्य केलं. पण मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला.

हो नाही की ना नाही…

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हाही मिलिंद नार्वेकर मातोश्रीत होते. पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने ते मातोश्रीच्या बाहेर पडले. यावेळी त्यांना मीडियाने घेरलं. तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर हो सुद्धा म्हणाले नाहीत आणि नाही सुद्धा म्हणाले नाहीत. हसत हसत सर्वांना हात जोडत ते निघून गेले. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काय निर्णय घेणार हे अद्याप समजू शकले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या सायलंट राहण्यात गुपीत दडल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून प्रचार

दरम्यान, उद्धव ठाकरे उद्यापासून प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान संपलं आहे. आता येत्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्यापासून सुरुवात करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.