Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayangarh Election Result 2021 LIVE: तृणमूल यंदाही नारायणगड विधानसभेची जागा राखणार का?

Narayangarh Assembly Election Result 2021 Live Update in Marathi : नारायणगड विधानसभा मतदार संघातून यावेळी पाच उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

Narayangarh Election Result 2021 LIVE:  तृणमूल यंदाही नारायणगड विधानसभेची जागा राखणार का?
नारायणगड विधानसभा
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:10 AM

कोलकाता : नारायणगड (Narayangarh) विधानसभा मतदार संघातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे अत्ता सूर्यकांत निवडणूक रिंगणात आहेत, तर रामप्रसाद गिरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे (मार्क्सवादी) तपस सिन्हा यंदाच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी नारायणगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे रामप्रसाद गिरी आणि तृणमूलचे अत्ता सूर्यकांत यांच्यात थेट लढत होत आहे.  (Narayangarh Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Narayangarh Assembly MLA Seat Candidate Party Winner Name Latest News in marathi)

2016 च्या निवडणुकीत काय झालं होतं…?

नारायणगड विधानसभेची जागा पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात येते. या जागेवर सध्या सत्ताधारी पक्षा टीएमसीचं वर्चस्व आहे. 2016 च्या निवडणुकीत तृणमूलच्या तिकिटावरुन इथून निवडणूक लढवलेल्या प्रदुत कुमार घोष यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या सुरजाकांत मिश्राला यांना 13 हजार 589 मतांनी पराभूत केलं होतं. प्रद्युत कुमार घोष यांना येथे एकूण 99 हजार 311 मते मिळाली तर सूरजकांत यांच्या खात्यात 85 हजार 722 मतांचं दान मतदारांनी टाकलं. इथे तिसर्‍या क्रमांकावर भाजप होतं, भाजप उमेदवाराला इथे 10 हजाराहून अधिक मते मिळाली होती.

मतदारांची संख्या किती

2016 च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 21 हजार 324 इतकी होती. यापैकी एकूण 2 लाख 1 हजार 316 मतदारांनी आपला मताधिकार वापरला होता. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण 269 बूथ तयार करण्यात आले होते तसंच इथे 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. साहजिक इथे मतदानाची टक्केवारी जास्त आहे.

मतदारसंघाचा इतिहास काय, वर्चस्व कुणाचं?

या जागेवर पहिल्यांदा 1952 मध्ये विधानसभेसाठी मतदान झाले होते, त्यामध्ये बीजेएस उमेदवाराचा विजय झाला. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये येथे बराच काळ सीपीएमचं वर्चस्व राहिले. सीपीएमने येथे सलग आठ निवडणुका जिंकल्या आहेत. टीएमसीने 2016 च्या निवडणुकीत त्यांचं वर्चस्व मोडित काढलं.

पाठीमागील निवडणुकीची आकडेवारी

सद्य आमदार- प्रोद्युत कुमार घोष मिळालेली मतं- 99 हजार 311 संपूर्ण मतदार- 2 लाख 21 हजार 324 मतदानाची टक्केवारी- 90. 69 टक्के निवडणुकीसाठी उमेदवार- 4

(Narayangarh Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Narayangarh Assembly MLA Seat Candidate Party Winner Name Latest News in marathi)

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.