PM Narendra Modi : ‘पाचही राज्यात भाजपचीच लाट’, नरेंद्र मोदींचा दावा! वाचा पंतप्रधानांच्या मुलाखतीतील 5 महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे.

PM Narendra Modi : 'पाचही राज्यात भाजपचीच लाट', नरेंद्र मोदींचा दावा! वाचा पंतप्रधानांच्या मुलाखतीतील 5 महत्वाचे मुद्दे
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:04 PM

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. अशावेळी पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मुलाखतीतल महत्वाचे 5 मुद्दे आपण पाहू.

‘पाचही राज्यात भाजप विजयी होणार’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा तर अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, ‘सबका साथ, सबका विकास’ हा मूलमंत्र घेऊन काम करतो.

‘मी सर्व राज्यात पाहतो आहे की, भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेलं आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारं फक्त फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं, इतकंच काम करत होती. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात तेव्हा अॅन्टी इन्क्मबन्सी येते. पण सरकारचा प्रयत्न दिसत असेल, योजनांची अंमलबजावणी दिसते तिथे सरकार विरोधी वातावरण दिसत नाही. भाजपशासित राज्यात प्रो इन्क्मबन्सी पाहायला मिळते, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केलाय.

‘बॅनरवरील फोटो मोदींच्या रुपात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा’

पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, उत्तर प्रदेशात अधिकाधिक बॅनरवर केवळ पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचाच फोटो पाहायला मिळाला. त्यावर मोदी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी एक कलेक्टिव्ह लिडरशीपवर विश्वास ठेवते. सामुहिकतेवर विश्वास ठेवते. बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची, आमचे आचार विचार, आमची नितीची आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल.

‘पराभूत होत होतच भाजप विजयी ठरली’

भाजप निवडणुकीत पराभूत होत होतच विजयी ठरली आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. अनामत रक्कम जप्त होताना पाहिली. एक वेळ असा होता की आमचे जनसंघाचे नेते पराभवानंतरही मिठाई वाटत होते. तेव्हा मला वाटलं की हे तर पराभूत झाले आहेत आणि मिठाई का वाटत आहे. तर तेव्हा आम्ही विचारलं की पराभवानंतरही मिठाई का वाटत आहात. त्यावेळी सांगितवलं गेलं की आमच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम वाचली होती. अशा काळ आम्ही पाहिला आहे.

‘विजयानंतरही आम्ही जमिनीशी जोडलेले राहतो’

आम्ही प्रयत्नरत असतो की विजय आमच्या डोक्यात गेला नाही पाहिजे. त्यामुळे विजयानंतरही आम्ही जमिनीवर राहतो. जमिनीसोबत आपलं नातं घट्ट करण्यावर आम्ही भर देतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. निराशेच्या गर्तेत अडकून पडत नाही. आम्ही समोरच्याची रणनिती समजून घेण्याचा आणि आमच्या चुकांचा अभ्यास करतो. त्यानुसार आम्ही पुढील रणनिती ठरवतो. आमच्यासाठी निवडणूक ही एकप्रकारे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला आमच्या शिक्षणाचा भाग मानतो, असं मोदी यावेळी म्हणाले.

‘उत्तर प्रदेशात आज सुरक्षा आणि विश्वासाचं वातावरण आहे’

योगींची मेहनत, त्यांच्या यशस्वी योजना या अद्भुत आहेत. त्यांनी असंभव गोष्टी संभव करुन दाखवल्या आहेत. त्यामुळेच विरोधकही त्यांच्या योजनांना कॅश करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एकप्रकारे मी त्याला योगींचे क्रेडीट मानतो. उत्तर प्रदेशच्या जनतेनं अनेक अडचणींचा सामना केला आहे. तिथे ज्या प्रकारे गुंडाराज आणि दबंगराज चालत होता. तिथल्या सरकारमध्ये दबंग लोकांना आश्रय प्राप्त होता. आमच्या माता-भगिनी घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या. हे सर्व उत्तर प्रदेशच्या जनतेलं पाहिलं आहे. आज मात्र उत्तर प्रदेशातील मुलगी म्हणते की मी रात्रीच्या अंधारातही कुठे काम असेल तर बाहेर पडू शकते. हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तो सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.

इतर बातम्या :

Video : शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया काय? रवी राणांचाही गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संजय राऊत तुम्हची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले; नारायण राणेंचा गर्भित इशारा

पुणेकरांना मोठा दिलासा! मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा महापालिकेचा निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.