पंजाबात काँग्रेसच्या तब्बल 50 पेक्षा जास्त जागा घटल्या, तर अकाली दलाच्या जागांमध्ये मोठी घट
Ad
पंजाबमध्ये प्रस्थापित पक्षांना मात देत आपचा दणदणित विजय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
पंजाबमध्ये प्रस्थापित पक्षांना मात देत आपचा दणदणित विजय, 85 पेक्षा जास्त जागा घेत केजरीवालांचा आम आदमी पक्ष बनला सगळ्यात मोठा पक्ष
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांचा दोन्ही मतदारसंघातून पराभव, मोबाईल रिपेरिंगचं काम करणाऱ्या लाभ सिंह उगोके या आप उमेदवाराचा विजय झाला आहे.
पंजाबात काँग्रेसच्या तब्बल 50 पेक्षा जास्त जागा घटल्या, तर अकाली दलाच्या जागांमध्ये मोठी घट
कॅप्टन अमरिंदर सिंह यांचाही पंजाबमध्ये पराभव, तर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाबच्या जनतेनं नाकारलं
कॉमेडियन भगवंत मान होणार पंजाबचे मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची घोषणा
अभिनेता सोनू सूदची बहीण मालविक सूद हीचाही आप उमेदवाराकडून पराभव
पंजाबमधील या दिग्गजांचा पराभव: सुखबिर बादल, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू, चरणजीतसिंह चन्नी
बसपा आणि अकाली दलासोबत युती होती, मात्र त्यालाही पंजाबमधील मतदारांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही
पंजाबमध्ये शेड्यूल कास्ट मत सर्वाधिक आहे, पंजाबात चरणजीतसिंह चन्नी हे पहिले शेड्यूल कास्ट मतदारांचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री ठरले होते, मात्र सर्वाधिक मतदार एससी असूनही त्यांना नाकारण्यात आल्यानं काँग्रेसलाही मोठा धक्का बसलाय.
गोवा, यूपी, उत्तराखंड, मणिपूर वगळता एकट्या पंजाबमध्ये सत्तांतर झालं असून आप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आता दिल्लीनंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाला आहे.