Punjab Assembly Election 2022: केजरीवालांची ‘चाणक्य’निती! ‘आप’ची चक्क सेन्च्युरी होण्याचा अंदाज

Punjab Election Exit Poll Result 2022: चाणक्यने वर्तवलेला हा एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांनी रीट्वीट केला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहे. 2017च्या मध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता. तर आप हा दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला होता.

Punjab Assembly Election 2022: केजरीवालांची 'चाणक्य'निती! 'आप'ची चक्क सेन्च्युरी होण्याचा अंदाज
काँग्रेसमध्ये पंजाबला मोठा फटकास बसणार?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 9:37 PM

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी एक्झिट पोलबाबत (Exit Poll) केलेलं एक रीट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे. एका एक्झिट पोलचा हवाला देत अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये चक्क आम आदमी पार्टीला शंभरच्या आसपास जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार, पंजाबमध्ये केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची सत्ता पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) येईल, असं बोललं जातंय. टुडेज चाणक्यने निवडणुकीबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष म्हणून पंजाबमध्ये आप समोर येईल, असं सांगण्यात आलं आहे. 100 जागा आपला मिळतील, असं सांगितलं जातंय. त्यातील 11 जागा कमी जास्त होऊ शकतात, असंही सांगण्यात आलंय. या अंदाजांनुसार, संपूर्ण बहुमत आपला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपची सेन्च्युरी इतरांचं काय?

पंजाब विधानसभा निवडुकांमध्ये आपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता एकीकडे वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपला जेमतेम एकच जागा मिळेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अकाली दलाला 6 तर काँग्रेसला 10 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चाणक्यने वर्तवलेला हा एक्झिट पोल अरविंद केजरीवाल यांनी रीट्वीट केला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहे. 2017च्या मध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता. तर आप हा दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला होता. 2017 मध्ये आपला 20 जागा जिंकण्यात यश आलं होतं. तर काँग्रेसनं 77 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, अकाली दलाला 15 तर भाजपला 3 जागा जिंकण्यात यश आलं होतं. दरम्यान, आता 10 मार्चला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांत कुणाच्या पारड्यात नेमक्या किती जागा मिळतात, हे स्पष्ट होईल. मात्र त्याआधी समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलची चर्चा रंगली आहे.

कुणाचा सर्वे काय सांगतो?

  1. टीव्ही 9 पोलस्ट्रॅट काँग्रेस 24-29 आप 56-61 अकाली दल 22-26 इतर 0-6
  2. एबीपी सी वोटर काँग्रेस 22-28 आप 51-61 अकाली दल 20-26 इतर 1-5
  3. इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया काँग्रेस 19-31 आप 76-90 अकाली दल 7-11 इतर 1-2
  4. टाईम्स नाऊ-नवभारत काँग्रेस 22 आप 70 अकाली दल 19 इतर 6
  5. न्यूज 24 टुडे काँग्रेस 10 आप 100 अकाली दल 6 इतर 1

संबंधित बातम्या :

‘कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील!’ निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना काळजी करण्याचा सल्ला

Exit polls results 2022 : दोन राज्यात भाजपच्या हातून सत्ता जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, ती दोन राज्य कोणती?

Exit Poll Results 2022: यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.