Punjab Assembly Election 2022: पंजाबमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) करिश्मा दाखवणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. अनेक सर्व्हेंमध्येही आपल्याला बहुमत मिळेल, असा कौल दिसून येतोय. यामुळे पंजाबचा पुढील मुख्यमंत्री आपचाच असेल फक्त आपच्या नेत्यांपैकी जनतेला कोणता मुख्यमंत्री हवाय, हे लोकांनीच सांगावं, असं आवाहन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलंय. यासाठी त्यांनी एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेनं आपल्या नेत्याचे नाव सांगावे. ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
आम आदमी पार्टी प्रमुख अरविंद केजरीवाल हे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘ जवळपास सर्वच सर्वेक्षणांमध्ये आपला 57, 57 किंवा 60 च्या जवळपास जागा मिळणार असल्याचा कौल दिसून येत आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काही पावलंच दूर आहोत, असे वाटते आहे. फक्त दोन-तीन जागांचाच प्रश्न आहे. सर्व मतदारांनी उत्साहानं मतदान करा, स्वयंसेवकांनी जोरदार प्रचार करा. एक शेवटचा धक्का मारा. किमान 80 च्या पुढे जागा आपकडे यायल्या हव्यात. पंजाबमध्ये आपचेचे सरकार बनेल, हे निश्चित आहे. त्यामुळे आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हाच पंजाबचा मुख्यमनंत्री असेल. अनेक पक्ष आपापल्या कुटुंबियांना, मुलाला, नातेवाईकाला मुख्यमंत्री बनवतात. पंजाबमध्येही भगवंतमानजी हे माझे लहान भाऊ आहेत. पंजाबमधील मोठे नेते आहेत. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवू, तेव्हा ते नको म्हणाले. बंद खोलीत सीएमचा चेहरा ठरवण्याची प्रथा बंद केली पाहिजे. आपण थेट लोकांनाच विचारुया, त्यांना त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांपैकी कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचे, हे ठरवता येईल..
पंजाब में आम आदमी पार्टी का CM चेहरा कौन हो- हमें जनता बताए। Press Conference | LIVE https://t.co/beaAD4tHcL
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 13, 2022
पंजाबमध्ये आपचे सर्वात मोठे नेते भगवंत मान हे असून आपची सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भगवंतमान म्हणाले, ‘ अनेकदा राजकीय पक्ष जनतेवर मुख्यमंत्री थोपवतात. लोकांना त्यांची सुख-दुःख समजून घेणारा नेता मुख्यमंत्री म्हणून हवा असतो. आपच्या नेत्यांपैकी कुणाला ही जबाबदारी द्यायची हे जनतेलाच ठरवू द्या, असा प्रस्ताव मी केजरीवाल यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर आम्ही 7074870748 हा नंबर जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, SmS करून, व्हॉट्सअप मॅसेज करून मनपसंद मुख्यमंत्र्याचा चेहरा जनतेनं सांगावा, असे आवाहन भगवंतमान यांनीही केले आहे.
इतर बातम्या-