Video : पंजाबमध्ये हिंसा भडकावून केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, कुमार विश्वास यांचा गौप्यस्फोट

पंजाबमध्ये हिंसा भडकावून केजरीवाल यांना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी केली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे मनिष सिसोदिया यांच्याकडे सोपवून पंजाबची सूत्रे हाती घेण्याचा त्यांचा प्लान होता, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे.

Video : पंजाबमध्ये हिंसा भडकावून केजरीवाल यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, कुमार विश्वास यांचा गौप्यस्फोट
केजरीवाल यांच्याबाबत गोप्यस्फोट करणारा व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 8:26 PM

नवी दिल्ली : पंजाबमध्ये निवडणुकीची (Punjab Elections 2022) रणधुमाळी सुरू असतानाच केजरीवाल (Arvind kejriwal) यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबमध्ये हिंसा भडकावून केजरीवाल यांना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी केली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे मनिष सिसोदिया यांच्याकडे सोपवून पंजाबची सूत्रे हाती घेण्याचा त्यांचा प्लान होता, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे. कुमार विश्वास यांची ही मुलाखतही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विश्वास अनेकदा केजरीवालांवर निशाणा साधतात. आता या नव्या व्हिडिओने पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या व्हायरल मुलाखतीत कुमार विश्वास म्हणतात, ‘मी म्हणालो की तिथे भावना भडकावू नका, आग लावू नका. पंजाबमध्ये शांतता भंग पावावी असे कोणालाच वाटत नाही. हिंदूंना नको, शीखांनाही नको. तेथील एकाही हिंदूने सांगितले नाही की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे… लुधियाना मंदिर आणि दरबार साहिब यांच्याबद्दल तिथल्या हिंदूंमध्ये आदर समान आहे. केजरीवाल यांना वाटले होते की तिथे 90 जागा येतील आणि मी त्या जागेचा मुख्यमंत्री होईन. मी म्हणालो की पंजाबचे लोक तुम्हाला तिथे स्वीकारणार नाहीत.

कुमार विश्वास पुढे या मुलाखतीत म्हणतात, ‘मी म्हणालो की तिथले लोक पगडीशिवाय माणसाला स्वीकारणार नाहीत. पंजाब हा प्रांत नसून पंजाब ही जगभरातील शीखांसाठी एक भावना आहे. अशात मी अरविंद यांना विचारले की तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? पण त्यांना दोनशे टक्के मुख्यमंत्री व्हायचे होते. जेव्हा मी मुख्यमंत्री होण्याचा फॉर्म्युला काय आहे? असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की 90 जागा येतील जेव्हा आम्ही फुलका गट आणि भगवंत मान गटात फूट पाडू. केजरीवाल यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे हे सांगताना, केजरीवाल दिल्ली सिसोदिया यांच्याकडे सोपवण्यास तयार झाल्याचेही कुमार विश्वास सांगतात. फुल्का आणि भगवंत मान गटात फूट पाडून केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रपदी विराज होण्याचा मानस किती खरा होता हे आता कदाचितच स्पष्ट होईल, मात्र निवडणुकीच्या तोंडावर कुमार विश्वास यांचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कुमार विश्वास यांचा व्हायरल व्हिडिओ

केजरीवाल यांनी पंजाबचा मुख्यमंत्री होण्याचा हट्टच धरला, त्यावेळी मी त्यांना समजावून सांगितले की, पंजबा ही बोर्डरवर असणारे राज्य आहे आणि केंद्रातील भाजप सरकारशी तुमचे जुळत नाही, अशा परिस्थितीत खूप कठीण जाईल. हे सर्व समजावून सांगितल्यानंतर केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा हट्ट सोडला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, असेही कुमार विश्वास सांगतात. सुरूवातील आम आदमी पार्टी उभी करण्यात कुमार विश्वास यांचे मोठे योगदान आहे. मात्र नंतर अरविंद केजरीवाल यांच्या न जुळल्याने कुमार विश्वास आम आदमी पार्टीपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी कायम अरविंद केजरीवाल यांना नेहमी टार्गेट केले आहे.

ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ, जितेंद्र नवलानी कौन है, राऊतांनी ईडीच्या वसुली एजंटांची मांडली कुंडली!

ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं? कोण ‘टाईट’ करतंय? पहिल्यांदाच राऊतांनी फोडून सांगितलं?

हिजाब-बुरखा घातलेल्या महिलेचे चाकूनं सपासप वार, टॅक्सी चालकावर का केला हल्ला?