tv9 explainer : केजरीवालांचा ‘आप’ राष्ट्रवादीच्या पंगतीत बसणार? राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणते निकष?

चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला हवं. देशात सध्या तीन प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक किंवा प्रादेशिक. भारतात सध्या 7 राष्ट्रीय पक्ष आहेत, तर 35 राज्यस्तरीय पक्ष आहेत. प्रादेशिक पक्षांची संख्या 350 च्या घरात आहे.

tv9 explainer : केजरीवालांचा 'आप' राष्ट्रवादीच्या पंगतीत बसणार? राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणते निकष?
अरविंद केजरीवाल, भगवंत मानImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:43 PM

चंदिगढ : पंजाब विधानसभा निवडणुकांचे निकाल (Punjab Election Results 2022) हाती आले आहेत. निवडणुकीत आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) स्पष्ट बहुमत मिळालं असून तो पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 2017 च्या निवडणुकीत सत्तेपासून दूर राहिलेला ‘आप’ प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. तेव्हापासूनच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा आम आदमी पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक करण्याचा अंदाज वर्तवला जात होता. दुपारी चार वाजेपर्यंत 117 पैकी 90 हून अधिक जागांवर ‘आप’ने आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस, भाजप, अकाली दल या प्रमुख पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेनेला जे अद्याप जमलं नाही, ते करण्याचा म्हणजेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह सात पक्षांच्या पंगतीत बसण्याचा मान ‘आप’ला मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पंजाबच्या संगरुर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदारकी मिळवणाऱ्या भगवंत मान (Bhagwant Mann) यांना आम आदमी पक्षाने आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. आता भगवंत मान यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होणं निश्चित आहे. ‘आप’ची सत्ता आलेले पंजाब हे दिल्लीनंतरचे दुसरे राज्य ठरणार आहे. गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांच्या रिंगणातही आप उतरली होती, मात्र तिथे त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. अशा वेळी, चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला हवं.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणाला मिळतो?

देशात सध्या तीन प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक किंवा प्रादेशिक. भारतात सध्या 7 राष्ट्रीय पक्ष आहेत, तर 35 राज्यस्तरीय पक्ष आहेत. प्रादेशिक पक्षांची संख्या 350 च्या घरात आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी तीन निकष आहेत, यापैकी किमान एका अटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याच्या तीन अटी कोणत्या?

1. लोकसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये 2 टक्के जागा जिंकाव्यात

2. चार लोकसभा जागांशिवाय लोकसभा निवडणुकीत सहा टक्के मतं मिळवावीत, किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा अधिक राज्यात सहा टक्के मतं मिळवावीत

3. चार किंवा अधिक राज्यांमध्ये स्थानिक किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळावी.

या तीन निकषांपैकी एखाद्या पक्षाने एकाचीही पूर्तता केली, तरी तिला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

आम आदमी पक्षाला हा दर्जा मिळेल का?

दिल्लीत सलग दोन निवडणुकांमध्ये विक्रमी विजय मिळवल्यानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रस्थापित करण्याची संधी दिली. ‘आप’ने दुसरा मानदंड पूर्ण केला, म्हणजेच पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यातून कमीत कमी 6 टक्के मतं मिळवली, आणि लोकसभेत त्यांचे चार खासदार पोहोचले, तर राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. मात्र सध्याचे कल पाहता आपचं हे स्वप्न तूर्तास तरी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता दिसत नाही.

विशेष म्हणजे लोकसभेतही आपचा एकच खासदार आहे, तोही पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी राजीनामा देईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील संगरुर मतदारसंघातून भगवंत मान या एकमेव उमेदवाराने खासदारकी मिळवली होती.

राष्ट्रीय पक्ष ठरल्याचे फायदे काय?

राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास आरक्षित निवडणूक चिन्हाच्या रुपात फायदा होतो.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या प्रस्तावकांची संख्या वाढू शकते

राष्ट्रीय मीडियावर विनामूल्य एअरटाइम उपलब्ध होतो

सध्या कोणत्या पक्षांना राष्ट्रीय दर्जा?

भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष (बसप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे सात राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड सारखे पक्ष प्रादेशिक पक्षांच्या यादीत मोडतात.

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेशातल्या विजयानं योगी आदित्यनाथ आता भाजपाचे नंबर 2 चे नेते झालेत का?

पंजाबमधील बंपर विजयाने ‘आप’ला लॉटरी, राज्यसभेवर 7 सदस्य निवडून जाणार; वाचा गणित काय?

केजरीवालांनी लिहून दिलं होतं आणि जशास तसं घडलं, मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर पराभूत, पाहा व्हिडिओ

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.