पणजी : गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत तिथं तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022 )आणखी रंगत आली आहे. गोव्यात अजून प्रचाराचा पूर्ण रंग चढला नाही, हळू हळू रंग चढतोय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. भाजपाचे नेत (BJP) अजूनही गोव्यात तळ ठोकून आहेत, त्यांना गरज आहे तळ ठोकण्याची, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. राहूल गांधी यांच्या प्रचार सभाबाबत ऐकलं, गोव्यात शांततेत प्रचार होते असेही राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेनेही गोव्याच्या प्रचारात जोर लावला आहे, आम्ही प्रथमच 11 जागा लढतोय अशी माहिती राऊतांनी दिली आहे. यापूर्वी दोन किंवा तीन जागा लढवत आलो. यावेळी राष्ट्रवादीशी आघाडी आहे. उत्पल यांच्यासाठी आम्ही जागा सोडली आहे. आम्ही खूप गार्भीयाने लढतो, आदित्य ठाकरे 11 आणि 12 तारखेला येत आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली आहे.
गोव्यात माहोल आम्ही बनवला
गोवा निवडणुकीत प्रचाराचा माहोल शिवसेनेने तयार केलाय. पणजीत भाजपचा उमेदवार पाडता यावा म्हणून शिवसेनेनी उमेदवारी दिली नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेना पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून आम्ही लढतोय, भाजपच्या पायाखालची जमीन सरकलीय, आमचा हेतू कुणाच्या सीट पाडण्यासाठी नाही, असेही राऊत म्हणाले. ओवीसींवर फायरिंग झाली त्यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे. निवडणुकांमध्ये स्टंट म्हणावं का? हे मला कळत नाही, यूपीत त्यांच्या पक्षाची दखल कुणी घेत नाही. मात्र या हल्याचे उत्तर भाजपने द्यायला हवे कारण त्यांची तिथं त्यांची सत्ता आहे, असेही राऊत म्हणाले.
नितेश राणे यांच्याविरोधातली कारवाई कायद्याने
नितेश राणे यांच्याबद्दलची कारवाई सुड सुद्धीने नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत. मुख्यमत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती समान न्याय कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात अशी प्रतिक्रिया राऊतांनी नितेश राणेंच्या अटकेवर दिली आहे. राणे सर्वाच्च न्यायालयापर्यत जावून आलेत, त्यामुळे राणेंनी सुडाचा आरोप करणे योग्य नाही. कायद्याच्या चौकशीला राणेंनी सामेरं गेलं पाहिजे, राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, त्यांच्यावर म्यॉव म्यॉवचा गुन्हा दाखल नाही, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच कोण काय आमच्या विषयी बोलतं त्यावर आमच्या भमिका ठरत नाही. भाजप विरोधी पक्ष म्हणून अत्यंत खालच्या पद्धतीने टिकास्त्र करत आहेत, त्यांकडे आम्ही दुर्लेक्ष करतो. अशा टीकेमुळे त्यांच्याच प्रतिमेला तडे जातात असेही राऊत म्हणाले आहे.