Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील अवमानकारक टीकेनंतर ए राजा यांना उपरती, मागितली जाहीर माफी!
एका प्रचार रॅलीदरम्यान ए राजा यांनी पलानीस्वामी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं होतं. ए राजा यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली.
चेन्नई : डीएमके नेता ए राजा यांनी तानिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर माफी मागितली आहे. एका प्रचार रॅलीदरम्यान ए राजा यांनी पलानीस्वामी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं होतं. ए राजा यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात आली. विविध पक्षाच्या नेत्यांनी ए राजा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. “पलानीस्वामी यांना एका प्रचार रॅलीत रडताना पाहून मला दु:ख झालं. मला त्यांच्या खासगी आयुष्यावर टीका करायची नव्हती. मी फक्त त्यांच्या राजकीय करिअरची तुलना करत होतो”, असं ए राजा यांनी म्हटलंय.(A Raja apologizes after offensive remarks against Tamil Nadu CM Palaniswami)
स्टालिनच्या चप्पलसोबत पलानीस्वामींची तुलना
ए राजा यांनी एका प्रचारसभेत “डीएमकेचे सर्वेसर्वा एमके स्टालिन आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या तुलना केली. स्टालिन याचं राजकीय करिअर पाहता त्यांचा जन्म योग्यरित्या झाला आहे. पण पलानिस्वामी यांच्याकडे पाहून असं वाटतं की ते अयोग्य नात्यातून जन्माला आलेले प्रिमॅच्युअर चाईल्ड आहेत”, अशी आक्षेपार्ह टीका केली होती.
इतकच नाही तर ए राजा यांनी पलानीस्वामी यांची तुलना एमके स्टालिन यांच्या चपलेशी केली होती. राजा यांनी म्हटलं की, पलानीस्वामी यांची किंमत एमके स्टालिन यांच्या चपलेपेक्षाही कमी आहे. ए राजा यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येऊ लागला.
‘जो महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो’
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हे ए राजा यांनी केलेल्या अपमानकारक टीकेनंतर भावूक झालेले पाहायला मिळाले. “समाजात एका आईचं स्थान किती महत्वाचं असतं. जो कोणी महिलेचा अनादर करतो त्याला देव शिक्षा देतो”, अशा शब्दात पलानीस्वामी यांनी ए राजा यांच्या टीकेला उत्तर दिलं.
TN CM EPS emotionally breaks down about DMK MP A Raja’s derogatory remarks about his mother. Campaigning in Thiruvotriyur he said just because an ordinary person who is not from a big family has become 1/2 pic.twitter.com/f81DQUgycV
— Savukku_Shankar (@savukku) March 28, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
A Raja apologizes after offensive remarks against Tamil Nadu CM Palaniswami