ओवेसींवरच्या गोळीबाराचा CCTV व्हिडीओ पाहिलात? दोन हल्लेखोर, गोळीबार आणि गाडीची धडक, काय घडलं?
खुद्द ओवेसींनीही त्यांच्या गाडीची काय स्थिती झाली त्याचे फोटो ट्विट केलेत. पोलीसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय तर उत्तर प्रदेश, केंद्र तसच निवडणूक आयोगानं ह्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी ओवेसींनी केलीय.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)यांच्यावर उत्तर प्रदेशात केले गेलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV) आता समोर आलंय आणि त्यात दोन हल्लेखोर स्पष्ट दिसतायत. गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातल्या मेरठवरुन दिल्लीच्या जात असताना ओवेसी यांच्यावर दोन पिस्तुलधाऱ्या हल्लेखोरांनी फायरिंग केली. त्यात ओवेसी थोडक्यात बचावले. पण त्यांच्या गाडीची गोळ्यांनी चाळणी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. खुद्द ओवेसींनीही त्यांच्या गाडीची काय स्थिती झाली त्याचे फोटो ट्विट केलेत. पोलीसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय तर उत्तर प्रदेश, केंद्र तसच निवडणूक आयोगानं ह्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी ओवेसींनी केलीय.
सीसीटीव्ही फुटेजचे असे काही ट्विट समोर आलेत
#AsaduddinOwaisi shooting case: 2 accused persons Sachin and Shubham arrested by police in connection with the shooting case.
CCTV footage of the accused shooting at @asadowaisi emerges. pic.twitter.com/Yfdmis4CmG
— Suraj Suresh (@Suraj_Suresh16) February 3, 2022
CCTV व्हिडीओत काय दिसतं? ओवेसींवरील हल्ल्याचं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, त्यात दोन हल्लेखोर स्पष्ट दिसतायत. एक काळी गाडी टोल नाक्यावरुन जातेय, तिच्या समोर एक जण लाल शर्टमध्ये धावत येतो आणि एका पांढऱ्या गाडीवर तो अंधाधूंद गोळीबार करतो. पण त्या पांढऱ्या गाडीवाल्याला त्याचा अंदाज येतो आणि ती गाडी हल्लेखोराच्या अंगावर जात त्याला धडक देते, त्यात तो कोसळतो. पण त्याच वेळेस दुसरा एक हल्लेखोर सीनमध्ये येतोय, तोही त्याच दिशेला पुन्हा अंधाधूंद गोळीबार करतोय, जिकडे आधी पहिला हल्लेखोर गोळीबार करत होता. दुसरा हल्लेखोर हा पांढऱ्या शर्टमध्ये आहे. तो पिस्तूलातून काही राऊंड फायर करताना स्पष्ट दिसतोय. पण पहिला हल्लेखोर आणि दुसरा हल्लेखोर हे वेगवेगळ्या गाड्यांवर फायरिंग करतायत का असा सवाल निर्माण होतो. कारण ज्या पहिल्या गाडीवर हल्लेखोर फायरिंग करत होता ती वेगानं निघून गेल्याचं दिसतंय पण मग दुसरा हल्लेखोर कोणत्या गाडीवर हल्ला करत होता? का हल्लेखोरांना ओवेसी कोणत्या गाडीत आहेत याचा अंदाज नव्हता? काहीही असो पण व्हिडीओतून ओवेसींवर झालेला हा जीवघेणा हल्ला गंभीर असल्याचं स्पष्ट दिसतंय.
पोलीसांनी काय कारवाई केली?
ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावं असल्याचं स्पष्ट झालंय. पण ते कुणाशी संबधीत आहेत, काय करतात, कुठल्या पक्षाचं ते काम करतात याची माहिती अजून देण्यात आलेली नाही. यातला एक आरोपी आधी घटनास्थळावरुन फरार झाला तर दुसरा मात्र स्वत: पोलीसात जाऊन शरण आला. ओवेसींच्या म्हणण्यानुसार चार एक हल्लेखोर होते. असं असेल तर मग त्या सर्वांचा शोध घेण्यासाठी यूपी पोलीसांनी चार पथकं तयार केलीयत. दोन आरोपींना पकडल्याची माहिती मेरठचे एसपी दिपक भूकर यांनी दिलीय. इतरांचा सोध सुरु आहे. दरम्यान केंद्र, यूपी सरकार आणि निवडणूक आयोगानं ह्या घटनेची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही ओवेसींनी केलीय. लोकसभेच्या सभापतींचीही भेट घेणार असल्याचं ओवेसींनी म्हटलंय.
हे सुद्धा वाचा:
बिन लग्नाचं राहू नका, जे राहिले त्यांनी देश वेठीस धरला; ओवेसींचा जोरदार हल्ला
AIMIM Rally: मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन