Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं मोदींविरोधात दंड थोपटले, लोकसभेला 100 जागा लढवण्याची घोषणा, राऊतांनी पूर्ण प्लॅन सांगितला

संजय राऊत म्हणाले की, ज्या उत्तर प्रदेशाच्या कायदा सुव्यवस्थेचे गोडवे भाजप नेते गातात. तिथे ओवेसींवर हल्ला करायला कोण धजावेल. त्यांच्या गाडीवर पाच राऊंड फायर केल्या गेल्या. त्यातली एकही गोळी लागत नाही. सर्व गोळ्या टायरच्या वर लागतात, हे नेमके काय आहे? सध्या भाजपकडे लोक लक्ष देत नाहीत. मुस्लीमही आकर्षित होत नाहीत. त्यासाठी हे सारे काही सुरू आहे.

उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं मोदींविरोधात दंड थोपटले, लोकसभेला 100 जागा लढवण्याची घोषणा, राऊतांनी पूर्ण प्लॅन सांगितला
संजय राऊत, शिवसेना नेते.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 11:34 AM

लखनऊः ओवेसींवर झालेला हल्ला हा मताच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. ज्या उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) कायदा सुव्यवस्थेचे गोडवे भाजप (Bjp) नेते गातात. तिथे ओवेसींवर हल्ला करायला कोण धजावेल. त्यांच्या गाडीवर पाच राऊंड फायर केल्या गेल्या. त्यातली एकही गोळी लागत नाही. सर्व गोळ्या टायरच्या वर लागतात. सध्या भाजपकडे लोक लक्ष देत नाहीत. मुस्लीमही आकर्षित होत नाहीत. त्यासाठी हे सारे काही सुरू आहे, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी भाजपवर सडकून टीका केली. शिवाय उत्तर प्रदेश फक्त झांकी आहे आणि लोकसभा अजून बाकी आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना आज उत्तर प्रदेशमधील 50 जागांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने राऊत यांच्यांशी संवाद साधला.

लोकसभेच्या 100 जागा लढवणार

संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी जागांवर लढतोय. असे नाही की 200 जागा आहेत. आम्ही फक्त 50-55 जागांवर लढतोय. हा पक्षविस्ताराचा कार्यक्रम आहे. पाचव्या टप्प्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेश, लखनऊच्या आसपास, अयोध्या, बांका फैजाबाद येथे उमेदवार उभे केले आहेत. शिवाय सहाव्या-सातव्या टप्प्यासाठी अलाहबाद, वाराणसी येथे उमेदवार देणार आहेत. खरे तर ही 2027 ची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा लढतोय. देशभरात 100 उमेदवार उभे करायचा विचार आहे, तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

मतांचे ध्रुवीकरण सुरू

‘एमआयएम’चे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसीं यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला झाला. काँग्रेस आणि सपाने हा मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. याप्रकरणी आपल्यालाही तसेच वाटत असल्याचे राऊत म्हणाले. ज्या उत्तर प्रदेशाच्या कायदा सुव्यवस्थेचे गोडवे भाजप नेते गातात. तिथे ओवेसींवर हल्ला करायला कोण धजावेल. त्यांच्या गाडीवर पाच राऊंड फायर केल्या गेल्या. त्यातली एकही गोळी लागत नाही. सर्व गोळ्या टायरच्या वर लागतात, हे नेमके काय आहे? सध्या भाजपकडे लोक लक्ष देत नाहीत. मुस्लीमही आकर्षित होत नाहीत. त्यासाठी हे सारे काही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

योगी खरे फकीर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबत राऊत म्हणाले की, संपत्तीत वाढ होणे म्हणजे संपत्तीची किंमत वाढणे. योगी हे खरे फकीर आहेत. त्याबद्दल आम्हाला शंका नाही, असा उच्चार त्यांनी केला. मात्र, उत्तर प्रदेश अखिलेश यादव जिंकतायत. विजयाच्या दिशेने त्यांनी कूच सुरू केले आहे, प्रियांकांचीही कामगिरी चांगली आहे, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

100 कोटींचा घोटाळा सिद्ध करा

मुंबईतील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपी किरीट सोमय्यांनी केलाय. त्याप्रकरणी आज राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. याबद्दल राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या कोण. मी त्यांना ओळखत नाही. गुन्हे दाखल करा, खटले चालवा. दंगलीच्या काळापासून माझ्यावर खटले चालत आहेत. त्यावेळेस हे शेपट्या घालून बसले होते. आरोप सिद्ध करू द्या. मोदी, शाह, फडणवीस यांच्यावर कमी आरोप होतायत का. स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडचा वास घ्यायचा, असा हा प्रकार आहे. ईडीचे लोक मुंबईत येतात. खोटे स्टेटमेंट घेतात. अनिल परबांविरुद्ध हे स्टेटमेंट द्या. संजय राऊत यांच्याविरोधात हे बोला असे सांगणे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग.
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया.
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश.
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर.
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा.
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप.