UP Election Result 2022 Live : बागपत, गौरीगंज आणि सिरथूमध्ये मतमोजणीदरम्यान गोंधळ, आंदोलन आणि दगडफेक
UP Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: : पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result 2022),उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलेय. आता सर्वांचं लक्ष या राज्यांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीनं निवडणूक लढवली. मायावती यांनी बसपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर, काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्त्व प्रियांका गांधी यांनी केलं. उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे. भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपा यांच्यापैकी कोणाची सत्ता येणार हे पाहावं लागणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
यूपीमध्ये अनेक ठिकाणी मतमोजणीवरून गोंधळ
उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मदमोजणीदरम्यान गोंधळ. बागपतमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा पाठलाग करुन सौम्य बळाचा वापर करत त्यांना तिथून हुसकावून लावलं. दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले.
-
बागपत, गौरीगंज आणि सिरथूमध्ये मतमोजणीदरम्यान गोंधळ, आंदोलन आणि दगडफेक
बागपत, गौरीगंज आणि सिरथूमध्ये मतमोजणीदरम्यान गोंधळ उडाला आहे. तसेच येथे दगडफेकीची घटना समोर आली आहे.
-
-
शामलीमधील तिन्ही जागांवर सपाचा कब्जा
SP ने शामलीमधील तिन्ही जागा जिंकल्या आहे. कैराना मतदारसंघातून सपा उमेदवार नाहिद हसन यांनी भाजप उमेदवार मृगांका सिंह यांचा पराभव केला. आसराफ अली यांनी ठाणे भवनमधून भाजपचे उमेदवार सुरेश राणा यांचा पराभव केला. शामली सदर विधानसभा मतदारसंघातून प्रसन्न चौधरी यांनी भाजपचे तेजेंद्र निर्वाल यांचा पराभव केला.
-
पराभवानंतर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, निवडणूक हरलोय, हिंमत नाही
Fazilnagar : फाजील नगरमधून सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. निकालानंतर ते म्हणाले की, जनतेचा निर्णय मला मान्य आहे. निवडणुकीत कोणी जिंकतो तर कोणी हरतो. म्हणूनच आपण जसा विजय साजरा करतो तसाच पराभव स्वीकारतो. आम्ही निवडणूक हरलो आहोत, हिंमत नाही.
I respect people’s mandate. I congratulate all winning candidates. Somebody loses, someone wins elections. These are 2 aspects of democracy. So, we’ll accept defeat just like we accept victory. We have lost elections, not courage: Swami Prasad Maurya, SP candidate from Fazilnagar pic.twitter.com/BXSALMg6qn
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
-
योगी म्हणाले.. लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू
योगी आदित्यनाथ म्हणाले की, यूपीमध्ये सुशासनासाठी पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन मिळाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व विजय मिळाला. सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास हे स्वप्न आपल्याला पुढे न्यायचे आहे. उत्तर प्रदेशातील 25 कोटी जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आम्ही जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करु.
-
-
ज्ञानपूरमध्ये बाहुबली विजय मिश्रा पराभूत
बाहुबली नेते विजय मिश्रा यांचा ज्ञानपूर विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव. मिश्रा अजूनही तुरुंगात आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांचा प्रचार करत होत्या. ज्ञानपूर मतदारसंघातून भाजप आघाडीचे उमेदवार विपुल दुबे विजयी झाले. सपाचे राम किशोर बिंड हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर विजय मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
-
यूपीत भाजपचं वर्चस्व कायम, पक्षाच्या मुख्यालयात योगी आदित्यनाथांचं कार्यकर्ते, नेत्यांसह सेलिब्रेशन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पक्षाच्या उत्तर प्रदेशातील मुख्यालयात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्ते, नेत्यांसह सेलिब्रेशन सुरु केलं आहे.
-
जसवंत नगरमधून शिवपाल यादव विजयी
जसवंत नगरमधून शिवपाल सिंह यादव 90 हजार 77 मतांनी विजयी झाले आहेत. शिवपाल यांना एकूण 1,58,531 मते मिळाली. भाजपचे उमेदवार विवेक शाक्य यांना 68,454 मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
योगी आदित्यनाथ यांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर ते दिल्लीला जातील, जिथे ते संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभागी होतील.
-
गोरखनाथ मंदिराबाहेर भाजपचा जल्लोष
उत्तर प्रदेश निवडणुकीतील कल आणि निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. दरम्यान, गोरखनाथ मंदिराबाहेरही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
#WATCH | Celebrations underway for the victory of Bhartiya Janata Party, at Gorakhnath Temple in Gorakhpur, Uttar Pradesh
As per the latest trends, BJP has won 5 and is leading on 245 so far.#UttarPradeshElections pic.twitter.com/83vCMsXUIt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
-
UP Election Results 2022 LIVE: अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला मोठे यश, 12 जागांवर आघाडी
अपना दल (सोनेलाल) यूपी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाने 17 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 12 जागांवर आघाडी मिळवली आहे. अपना दल (सोनेलाल) हा पक्ष काँग्रेस, बसपा यांसारख्या मोठ्या पक्षांच्या पुढे गेला. अनुप्रिया पटेल या पक्षाच्या प्रमुख आहेत. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष असून अनुप्रिया पटेल केंद्रीय मंत्री आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्या भाजपसोबत होत्या.
-
मुलायमसिंह यादव यांच्या घरासमोर भाजपचा जल्लोषाचा प्रयत्न
उत्तर प्रदेश लखनऊ
मुलायमसिंह यादव यांच्या घरासमोर जल्लोषाचा प्रयत्न
सपाचे कार्यकर्ते आक्रमक
मुलायम सिंग यादव यांच्या घरासमोर फटाके फोडण्याचा प्रयत्न
पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना केलं वेगळं
-
महाराष्ट्र अभी बाकी है म्हणताय महाराष्ट्र तैयार है: शरद पवारांचं प्रतिआव्हान
राजकीय जीवनात अशी स्थिती येत असते. 1977 मध्ये देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरात, कर्नाटक राज्यात काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली, असं अनेक लोकांनी सांगितलं होतं.1977 ला काँग्रेसला हरवणाऱ्या लोकांनी 1980 ला सत्ता दिली. पाच राज्यातील लोकांचं मत भाजपच्या बाजूनं आहे, असं हे मान्य करावं लागेल. महाराष्ट्र बाकी है म्हणताय तर महाराष्ट्र तैयार है, असं शरद पवार म्हणाले.
-
UP Election Result 2022 Live : भाजपकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी सुरु
UP Election Result 2022 Live : लखनौच्या भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी सुर करण्यात आली आहे.
-
UP Election Result | Gorakhpurमधून Yogi Adityanath 34 हजार मतांनी आघाडीवर
UP Election Result | Gorakhpurमधून Yogi Adityanath 34 हजार मतांनी आघाडीवर
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 252 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 252 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 116 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 10 जागांवर बीएसपी 3 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 3 जागा, राष्ट्रीय लोक दल 9 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत 401जागांचे कल हाती आले आहेत.
-
Varanasi South Election Result 2022 LIVE: भाजप उमेदवार वाराणसी दक्षिणमधून नीलकांत तिवारी आघाडीवर
उत्तर प्रदेशच्या वाराणसी दक्षिण मधून भाजप उमेदवार नीलकांत तिवारी आघाडीवर आहेत. ते 3652 मतांनी आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत सपा उमदेवार किशन दिक्षीत आघाडीवर होते.
-
उत्तर प्रदेशात भाजपला 248 जागांवर आघाडी
उत्तर प्रदेशात भाजपला 248 जागांवर आघाडी
ECI च्या वेबसाईटनुसार भाजपला 248 जागांवर आघाडी#ElectionsWithTV9 #UPElectionWithTV9 pic.twitter.com/LxFkx0prSs
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2022
-
UP Election Result 2022 Live : उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत. सिराथू मतदारसंघातून ते पिछाडीवर आहेत. सपाच्या उमेदवार पल्लवी पटेल या आघाडीवर आहेत.
-
UP Election Result 2022 Live : ही तर रामराज्याची सुरुवात : रवि किशन
गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवि किशन यांनी भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळं ही रामराज्याची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे.
-
UP Election Result 2022 Live : बहराईचमधून अनुपमा जयस्वाल पिछाडीवर
उत्तर प्रदेशातील माजी शिक्षणमंत्री अनुपमा जयस्वाल पिछाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे उमेदवार यासर शाह 5322 मतांनी आघाडीवर आहेत.
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशातील जनतेनं घराणेशाहीच्या राजकारणाला नाकारलं
उत्तर प्रदेशातील भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सुरवातीचे कल भाजपच्या बाजूनं येत असल्यानं विरोधी पक्षांना फटकारलं आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं घराणेशाहीच्या राजकारण्यांना नाकारलं असल्याचं ते म्हणाले.
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 111 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 12 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 8 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत 399 जागांचे कल हाती आले आहेत.
-
उत्तर प्रदेश काय मणिपूर, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपचं सरकार बनणार : रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे
पाच राज्यातल्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये भाजप दमदार पणानं निवडून येईल आणि सरकार बनवेल अशी आम्हाला खात्री होती. खरी फाईट होती भाजप आणि सपामध्ये मात्र. राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला, ममता बॅनर्जींनी पाठिंबा दिला.
उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपच्या विकासाच्या मुद्याला मतदान केलं आहे
गोव्यात आम्ही जवळपास बहुमताजवळ गेलो आहे.
मणिपूर, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपचं सरकार बनणार आहे.
भाजपची उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यात मोदी लाट कायम
कोरोना काळात मोफत लस दिली, मोफत अन्न दिलं, पुढचे काही वर्ष मोदींची लाट राहणार
येऊद्या लोकसभा मोदीजींची लाट कशी असेल ते कळेल
5 राज्याच्या निवडणुकांनंतर देशातील लोकांच्या मनात बदल होणार
महाराष्ट्रातील सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही
महाराष्ट्रातील सरकारला 2024 ला जनता पराभूत करेल
अमर अकबर अँथनीच्या सरकारला पराभवाला सामोरं जावं लागेल
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 108 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 13 जागांवर बीएसपी 4 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 4 जागा, राष्ट्रीय लोक दल 10 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे.
-
काही लोकांनी सत्तेच्या स्वार्थासाठी बेईमानी केली : सुधीर मुनगंटीवार
एक मोठं व्हिजन घेऊन भाजपनं निवडणुका लढवल्या. जातीच्या राजकारणाऐवजी, विषारी इर्शा या ऐवजी मतदारांनी मतदान केलं. या चार राज्यात केंद्र राज्य सरकार एकत्र येऊन विकासाची गाडी धावेल.
महाराष्ट्रात भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीला 161 जागा मिळाल्या होत्या.
काही लोकांनी सत्तेच्या स्वार्थासाठी, खूर्चीसाठी बेईमानी केली. बेईमानीचं आयुष्य जादा नसतं
आमच्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शिवसेनेवर टीकास्त्र
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 248 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 248 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 108 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 11 जागांवर बीएसपी 4 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 4 जागा, राष्ट्रीय लोक दल 10 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे.
-
लखीमपूरमध्ये 8 पैकी 7 जागांवर भाजप आघाडीवर
लखीमपूरमध्ये 8 पैकी 7 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. भाजप आज 5 वाजता जल्लोष साजरा करणार आहे.
-
Agra Rural Election Result 2022: बेबी रानी मौर्य आघाडीवर
यूपी आग्रा ग्रामीण विधानसभा मतदारसंघात माजी राज्यपाल बेबी रानी मौर्य आघाडीवर आहेत.
-
Sardhana Election Result 2022: भाजपचे संगीत सोम आघाडीवर
मेरठच्या सरधना विधानसभा मतदारसंगातून भाजपचे संगीत सोम 5123 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सपाचे अतुल प्रधान आहेत.
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 103 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 11 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 10 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4 जागांवर आघाडीवर आहे.
-
युपीच्या आयोध्येत 5 पैकी 4 मतदारसंघात भाजपला आघाडी
UP Election Result | युपीच्या आयोध्येत 5 पैकी 4 मतदारसंघात भाजपला आघाडी-tv9
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 247 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 247 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 103 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 11 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 9 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4 जागांवर आघाडीवर आहे.
-
Akhilesh Yadav : अखिलेश यादव थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
समाजवादी पक्षाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक
अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
काही वेळात अखिलेश यादव पत्रकार परिषद घेण्याची शक्य
-
Gorakhpur Urban Election Result 2022: CM योगी आदित्यनाथ 16000 मतांनी आघाडीवर
योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात भाजप आघाडीवर आहे,
-
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 239 जागांवर आघाडी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 239 जागांवर आघाडी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 239 जागांवर आघाडी #ElectionsWithTV9 #UPElectionWithTV9 pic.twitter.com/eCn9lXhMJg
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2022
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा संधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 236 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 97 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 9 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागेवर आघाडीवर आहे.
-
वाराणसीतील 8 पैकी 5 जागांवर भाजप आघाडीवर
वाराणसीतील 8 पैकी 5 जागांवर भाजप आघाडीवर
वाराणसी नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ
-
Gorakhpur Rural Election Result 2022: गोरखपूर ग्रामीणमध्ये भाजपला झटका सपा उमेदवार पुढे
गोरखपुर ग्रामीण या जागेवरुन विजय बहादुर यादव हे आघाडीवर आहेत. ते सपाकडून निवडणूक लढवत आहेत.
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात भाजपला 230 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 230 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 95 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 8 जागांवर बीएसपी 6 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 4 जागा, राष्ट्रीय लोक दल 5 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 2 जागेवर आघाडीवर आहे.
-
Lucknow Election Result 2022 : लखनौमध्ये भाजपला 6 तर सपाला 3 जागा
Lucknow Election Result 2022 : लखनौ मधील तीन जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. लखनौच्या 9 पैकी 6 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, सपा 3 जागांवर आघाडीवर आहे. लखनौ पूर्वमधील सपा उमेदवार अनुराग भदौरिया आघाडीवर आहेत.
-
UP Election Result 2022 Live : उत्तर प्रदेशात पुन्हा योगींचं राज
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 227 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 91 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 8 जागांवर बीएसपी 6 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 4 जागा, राष्ट्रीय लोक दल 5 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 2 जागेवर आघाडीवर आहे.
-
Mathura Election Result 2022: मथुरामध्ये BJP चे श्रीकांत शर्मा आघाडीवर
Mathura Election Result 2022: मथुरामध्ये BJP चे श्रीकांत शर्मा आघाडीवर आहेत
-
Fazilnagar Election Result 2022: स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर
Fazilnagar Election Result 2022: स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर पडले आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडत सपामध्ये प्रवेश केला होता.
-
UP Election Result 2022 Live : भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप सत्तेजवळ
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 200 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 89 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 8 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल ४ जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 2 जागेवर आघाडीवर आहे.
-
UP Election Result 2022 Live : भाजपला 182 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 182 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 88 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 8 जागांवर बीएसपी 4 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषी हमारा आम दाल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 6 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 1 जागेवर आघाडीवर आहे.
-
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची आघाडी टक्कर देतेय: संजय राऊत
आता मतमोजणी सुरु झालीय, पोस्टल मतदानावर संयमाने बोलायला हवं
उत्तर प्रदेशात अजून 20 20 फेऱ्यांची मोजणी व्हायची आहे
उत्तराखंड गोव्यात दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल : संजय राऊत
गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची आघाडी टक्कर देतेय: संजय राऊत
-
#UPprojectionsLive: नोएडातून भाजपचे पंकज सिंह यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल
यूपीच्या नोएडा विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार पंकज सिंह 3074 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानावर समाजवादी पार्टीचे सुनील चौधरी आहेत.
-
UP Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप 91 जागांवर आघाडीवर
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आतापर्यंत भाजप 91 जागांवर आघाडीवर#ElectionsWithTV9 #UPElectionWithTV9 pic.twitter.com/JlzoIOCOhA
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2022
-
Jaswantnagar Election Result 2022: शिवपाल सिंह यादव आघाडीवर
यूपीच्या जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून शिवपाल सिंह यादव यांनी कमबॅक केलं आहे. शिवपाल यादव सुरुवातीला पिछाडीवर होते.
-
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील 82 जागांचे कल जाहीर
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 82 जागांचे कल जाहीर
भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 82 जागांचे कल हाती आले आहेत. अपना दल 4भाजप 48समाजवादी पार्टी 24काँग्रेस 2 जनसत्ता दल लोकतांत्रिक 2#ElectionsWithTV9 #UPElectionWithTV9 pic.twitter.com/jbM79W96x3
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2022
-
Deoria Election Result 2022: BJP चे शलभमणी त्रिपाठी आघाडीवर
Deoria विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शलभमणी त्रिपाठी आघाडीवर आहेत.
-
भाजपला 200 जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशात पहिल्या तासाभरात भाजप आघाडीवर राहिला
भाजपला 200
सपा 105
बसपा 5
काँग्रेस3
इतर 3
-
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार
लखीमपूर खेरीमध्ये भाजप आघाडीवर
शेअर बाजारावर निवडणूक निकालांचा सकारात्मक परिणाम
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 190 जागांवर तर सपा 104 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 190 जागांवर तर सपा 104 जागांवर आघाडीवर, बसपा 6 तर काँग्रेस 3 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहे.
-
सिराथूचे मतदारसंघातून भाजपचे केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर
यूपीत भाजपचे महत्त्वाचे नेते आघाडीवर
अखिलेश यादव आघाडीवर
योगी आदित्यानाथ आघाडीवर
शिवपाल यादव पिछाडीवर
सिराथूचे मतदारसंघातून भाजपचे केशवप्रसाद मौर्य पिछाडीवर
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 162 जागांवर तर सपा 117 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 162 जागांवर तर सपा 117 जागांवर आघाडीवर, बसपा 6 तर काँग्रेस 3 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेशातील जवळपास 300 जागांचे कल हाती येत असून सपा आणि भाजपमध्ये कडवी लढत आहे.
-
Bagpat Election Result 2022: बागपतमधून भाजपचे योगेश धामा आघाडीवर
Bagpat Election Result 2022: बागपतमधून भाजपचे योगेश धामा आघाडीवर आहेत.पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हा मतदारसंघ आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 155 जागांवर तर सपा 119 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 151 जागांवर तर सपा 119 जागांवर आघाडीवर, बसपा 8 तर काँग्रेस 2 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 151 जागांवर तर सपा 115 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 151 जागांवर तर सपा 115 जागांवर आघाडीवर, बसपा 6 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 150 जागांवर तर सपा 105 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 150 जागांवर तर सपा 105 जागांवर आघाडीवर, बसपा 5 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 150 जागांवर तर सपा 100 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 150 जागांवर तर सपा 100 जागांवर आघाडीवर, बसपा 5 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
ज्याच्या ताब्यात उत्तर प्रदेश त्याच्या ताब्यात केंद्र सरकार : रावसाहेब दानवे
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर
शेतकरी आंदोलनाचा फटका बसेल असं वाटलं होतं
मात्र, शेतकऱ्यांनी देखील आम्हाला मतदान केलं
ज्याच्या ताब्यात उत्तर प्रदेश त्याच्या ताब्यात केंद्र सरकार
-
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का : अखिलेश यादव
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का : अखिलेश यादव
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का
मतगणना केंद्रों पर दिन-रात सतर्क और सचेत रूप से सक्रिय रहने के लिए सपा-गठबंधन के हर एक कार्यकर्ता, समर्थक, नेतागण, पदाधिकारी और शुभचितंक को हृदय से धन्यवाद!
‘लोकतंत्र के सिपाही’ जीत का प्रमाणपत्र लेकर ही लौटें!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 10, 2022
-
UP Election 2022 LIVE Updates : दक्षिण वाराणसीमधून सपाची आघाडी, भाजप उमेदवार पिछाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 136 जागांवर तर सपा 80 जागांवर आघाडीवर, बसपा 5 तर काँग्रेस 3 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहे.
दक्षिण वाराणसीमधून सपाची आघाडी, भाजप उमेदवार पिछाडीवर
-
Fazilnagar Election Result 2022: सपाचे स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर
Fazilnagar Election Result 2022: सपाचे स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर
स्वामी प्रसाद मौर्य भाजप सोडून सपामध्ये दाखल झाले होते
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 120 जागांवर तर सपा 79 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 120 जागांवर तर सपा 79 जागांवर आघाडीवर, बसपा 5 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 118 जागांवर तर सपा 77 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 118 जागांवर तर सपा 77 जागांवर आघाडीवर, बसपा 3 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : उत्तर प्रदेशातील 200 जागांचे कल हाती
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 116 जागांवर तर सपा 73 जागांवर आघाडीवर
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 112 जागांवर तर सपा 73 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 110 जागांवर तर सपा 73 जागांवर आघाडीवर, बसपा 3 तर काँग्रेस 2 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 110 जागांवर तर सपा 71 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 110 जागांवर तर सपा71 जागांवर आघाडीवर, बसपा 3 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव दोघेही आघाडीवर
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 100 जागांवर तर सपा 65 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 100 जागांवर तर सपा 65 जागांवर आघाडीवर, बसपा 3 तर काँग्रेस 2 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 88 जागांवर तर सपा 58 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 88 जागांवर तर सपा 58 जागांवर आघाडीवर
बसपा 3 तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर
-
Akhilesh Yadav : सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आघाडीवर
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 82 जागांवर तर सपा 55 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 82 जागांवर तर सपा 55 जागांवर आघाडीवर
बसपा 3 जागांवर आघाडीवर
समाजवादी पार्टी आणि भाजपमध्ये चुरस
उत्तर प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण होणार?
-
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 78 जागांवर तर सपा 50 जागांवर आघाडीवर
UP Election 2022 LIVE Updates : भाजप 75 जागांवर तर सपा 50 जागांवर आघाडीवर
बसपा 1 जागांवर आघाडीवर
सपाचे स्वामी प्रसाद मौर्य आघाडीवर
-
आझम खान यांचे पुत्र आघाडीवर
आझम खान यांचे पुत्र आघाडीवर
सपा नेते आझम खान यांचे पुत्र आघाडीवर आहेत
निवडणुकीच्या काळात आझम खान तुरुंगात होते
-
UP Election Result 2022 : भाजप 75 जागांवर तर सपा 50 जागांवरआघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 75 जागांवर तर सपा 50 जागांवरआघाडीवर
बसपाला 1 जागेवर आघाडी
-
UP Election Result 2022 : भाजप 70 जागांवर तर सपा 45 जागांवरआघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 70 जागांवर तर सपा 45 जागांवरआघाडीवर
बसपा 1 जागेवर आघाडीवर आहे
-
UP Election Result 2022 : भाजप 60 जागांवर तर सपा 42 जागांवरआघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 60 जागांवर तर सपा 42 जागांवरआघाडीवर
बसपा एका जागेवर आघाडीवर
-
UP Election Result 2022 : भाजप 53 जागांवर तर सपा 37 जागांवरआघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 53 जागांवर तर सपा 37 जागांवरआघाडीवर आहे. भाजपनं अर्धशतक पार केलं आहे. उत्तर प्रदेशात बसपानं खातं उघडलेलं आहे.
-
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 45 जागांवर भाजप तर सपा 32 जागांवर आघाडीवर
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 45 जागांवर भाजप तर सपा 32 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. पहिल्या कलात भाजप आणि सपामध्ये चुरस आहे. बसपा आणि काँग्रेसला अजून खात उघडता आलेलं नाही
-
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशात भाजप आणि सपामध्ये चुरस
UP Election Result 2022 : भाजप 35 जागांवर तर सपा 25 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या पाच मिनिटात भाजप आणि सपाला चांगली आघाडी मिळाली आहे.
-
UP Election Result 2022 : भाजप 15 जागांवर तर सपा 8 जागेवर आघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 15 जागांवर तर सपा 8 जागेवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
-
UP Election Result 2022 : भाजप 8 जागांवर तर सपा 4 जागेवर आघाडीवर
UP Election Result 2022 : भाजप 8 जागांवर तर सपा 4 जागेवर आघाडीवर आहे.
-
UP Election Result 2022 : भाजप 2 जागांवर तर सपा 1 जागेवर आघाडीवर
UP Election Result 2022 : पोस्टल मतांमध्ये भाजप 2 जागांवर आघाडीवर तर समाजवादी पार्टी 1 जागेवर आघाडीवर
-
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशातील पहिला कल भाजपच्या वाट्याला
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशातील पहिला कल भाजपच्या वाट्याला आलेला आहे.
-
UP Election Result : भाजपच्या कार्यालयात लगबग वाढली
2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल
5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
सर्व पक्ष कार्यालयात लगबग वाढली
भाजप मुख्यालय कार्यालयात निकाल आधी लगबग सुरू
सकाळपासून लाडू पुरी भाजी बनवला जात आहे .
-
UP Election Result : उत्तर प्रदेशात मतमोजणीला सुरुवात
भाजपनं उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवली त्यामध्ये विकासाचा मुद्दा
उत्तर प्रदेशात नितीन गडकरींच्या प्रचाराचा प्रभाव ठरणार
उत्तर प्रदेशात मतमोजणीला सुरुवात
-
Congress : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार?
उत्तर प्रदेशात लडकी हूं लड सकती हूं असं म्हणत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्व केलं
प्रियांका गांधी यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद
एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार का याकडे लक्ष
84 मतमोजणी केंद्रावर 403 जागांवर मतमोजणी
शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसेल अशी शक्यता आहे
पश्चिम यूपीमध्ये शेतकरी आंदोलनाचा प्रभाव
-
UP Election Result 2022 : शिवसेनेच्या 37 आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचं काय होणार?
उत्तर प्रदेशमध्ये 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल
निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी केलेली
भाजपला शह देण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षानं केला
नरेंद्र मोदींनी सायकलच्या मुद्यावरुन टीका केली
उत्तर प्रदेशमध्ये कुणाची हवा चालणार याकडे सर्वांचं लक्ष
शिवसेनेनं 37 जागांवर निवडणूक लढवल्या
राष्ट्रवादीनं 1 उमेदवार उभा केलाय
-
Karhal Election Result 2022: अखिलेश यादव करहल मतदारसंघातून रिंगणात, हाय व्होल्टेज लढतीकडलं लक्ष
उत्तर प्रदेशातील करहल विधानसभा मतदारसंघात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेच. भाजप उमेदवार बघेल यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.
-
Lucknow Election Result 2022 : लखनौमध्ये मतमोजणी केंद्रावर 3 टियर सुरक्षा व्यवस्था
उत्तर प्रदेशमधील लखनौ मधील मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे.
-
Varanasi Election Result 2022 : वाराणसीत मतमोजणी केंद्रावर कलम 144 लागू
Varanasi Election Result 2022: उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तरप्रदेशातील वाराणसीमध्ये मतमोजणी केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होईल. या मतमोजणीवेळी प्रथम पोस्टल मतदान मोजलं जाईल. त्यानंतर ईव्हीएम वरील मतं मोजली जातील.
-
Firozabad Election Result 2022 : फिरोझाबाद मतमोजणी केंद्रात कडेकोट बंदोबस्त
फिरोझाबाद विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शिकोहाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार आहे. या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
-
UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं कमळ की सपाची सायकल चालणार ?
केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत
उत्तर प्रदेशमध्ये महिलांचं मतदान भाजपला झाल्याचा अंदाज
मोफत राशन आणि राम मंदिर मुद्दा देखील चालण्याची शक्यता
2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपसाठी महत्त्वाची निवडणूक
-
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि सपामध्ये काटे की टक्कर
UP Election Result 2022 : 5 राज्यातील 1200 केंद्रावर मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपमध्ये काटे की टक्कर आहे.
-
UP Election Result 2022 : योगी आदित्यनाथ यांच्यासमोर समाजवादी पार्टीचं आव्हान
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. सुरुवातीला योगी आदित्यनाथ वाराणसीतून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. मात्र, त्यानंतर त्यांना गोरखपूर शहरमधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं. योगी आदित्यनाथ यांच्या समोर समाजवादी पार्टीच्या शुक्ला यांचं आव्हान आहे.
Counting of votes for Uttar Pradesh Assembly elections set to begin at 8am
Counting centre set up at Deen Dayal Upadhyaya Gorakhpur University, Gorakhpur pic.twitter.com/2m1vqlWA2O
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
-
UP Election Result : पोस्टल मतदान पहिल्यांदा मोजलं जाणार
उत्तर प्रदेशचा कौल कुणाला?
उत्तर प्रदेशमध्ये 84 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल.
मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि सपामध्ये मोठी लढत
पोस्टल मतदानानं मतमोजणीला सुरुवात
पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात
-
UP Election Result 2022 : संत कबीरनगरमध्ये कर्मचाऱ्याकडे मतपत्रिका आढळल्या
UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये मतमोजणी केंद्रावर कर्मचाऱ्याकडे दोन मतपत्रिका आढळल्यानं खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकारी या घटनेनंतर घटनास्थळी रवाना झाले आहेत. संत कबीर नगरच्या डीएम दिव्या मित्तल यांनी एका कर्मचाऱ्याकडे एका कागदात दोन मतपत्रिका आढळल्याचं सांगितलं. मात्र, या मतपक्षिकांचा वापर करण्यात आलेला नाही.
-
उत्तर प्रदेशमधील गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
उत्तर प्रदेश एकूण जागा 403
भाजप 325 समाजवादी पक्ष 47 बसपा 19 काँग्रेस 7
-
भाजपच्या प्रचाराची धुरा नरेंद्र मोदी तर समाजवादी पक्षाची धुरा अखिलेश यादव यांच्यावर
उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीनं निवडणूक लढवली.
Published On - Mar 09,2022 2:30 PM