Up Elections 2022 : योगींविरोधात लढणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांची संपत्ती किती? पत्नी, आईच्या नावावरील संपत्तीचा आकडा वाचा

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्याजवळ 44 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

Up Elections 2022 : योगींविरोधात लढणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांची संपत्ती किती? पत्नी, आईच्या नावावरील संपत्तीचा आकडा वाचा
चंद्रशेखर आझाद यांच्या संपत्तीची माहिती
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 4:26 PM

गोरखपूर : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) हे देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Up Elections 2022) रिंगणात आहेत. ते गोरखपूर शहरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi Adityanath) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. चंद्रशेखर आझाद हे त्यांच्या आझाद समाज पक्षाचे उमेदवार आहेत. चंद्रशेखर यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी आपल्यावर 17 गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 34 वर्षीय चंद्रशेखर यांनी 2012 मध्ये गढवाल विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले होते. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशीलही दिला आहे. यामध्ये त्यांनी 44 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे सांगितले आहे. मात्र, यापैकी 23 लाखांहून अधिक संपत्ती त्यांची पत्नी वंदना कुमारी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर त्याची आईकडे 15 लाखांचे घर आहे. चंद्रशेखर यांना युग नावाचा 4 महिन्यांचा मुलगाही आहे.

आझाद यांच्या संपत्तीचा सविस्तर तपशील

दाखल केलेल्या शपथपत्रात चंद्रशेखर यांनी त्यांच्याकडे 18 हजार रुपये आणि पत्नीकडे 12 हजार रुपये रोख असल्याचे सांगितले आहे. चंद्रशेखर यांचे फक्त एक बँक खाते आहे ज्यात 26 रुपये जमा आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे दोन खाती आहेत. एका खात्यात 84 हजार तर दुसऱ्या खात्यात 3.10 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे. चंद्रशेखर यांच्याकडे 40 ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत 1.96 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 400 ग्रॅमचे दागिने असून त्यांची किंमत 19.60 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 0.2 एकर शेतजमीन आहे. त्याची किंमत 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आईच्या नावावर छुटमलपूरमध्ये 1 हजार स्क्वेअर फुटाचे घर आहे, ज्याची किंमत 15 लाख रुपये आहे. चंद्रशेखर यांनी स्वत:वर कर्ज नसल्याचे म्हटले आहे.

गोरखपूरमधून निवडणुकीत का उतरले?

चंद्रशेखर आझाद यांच्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी निवडणुकीतील युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, हे प्रकरण निष्कर्षापर्यंत न पोहोचल्याने युती होऊ शकली नाही. चंद्रशेखर हे पश्चिम यूपीचे नेते आहेत, मात्र पूर्वांचलमध्ये जाऊन योगींच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याचे एक मोठे कारण म्हणजे गोरखपूर शहरातील जातीची आकडेवारी. 4 लाखांहून अधिक मतदार असलेल्या या जागेवर 40-40 हजार कायस्थ आणि निषाद मतदार आहेत. दलित मतदारांची संख्या सुमारे 50 हजार आहे. मुस्लिम मतदारही 45 हजारांच्या जवळपास आहेत. याशिवाय 25 हजारांहून अधिक कुर्मी मतदार आहेत. मागासवर्गीय, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या पाहूनच चंद्रशेखर आझाद यांनी मुख्यमंत्री योगींच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

गोरखपूर भगव्याचा बालेकिल्ला

गोरखपूर शहराची जागा भगव्याचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखली जाते. कारण 1977 पासून आतापर्यंत असे फक्त 4 वेळा घडले आहे जेव्हा एक बिगर भाजप आमदार येथून आमदार झाला आहे. त्यातही एकदा अखिल भारतीय हिंदू महासभेने बाजी मारली आहे. येथून जनता पक्षाचे अवधेश कुमार श्रीवास्तव 1977 मध्ये, इंदिरा कॉंग्रेस 1980 मध्ये आणि सुनील शास्त्री 1985 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. 1989 च्या विधानसभा निवडणुकीपासून या जागेवर भगवा फडकत आहे. भाजपचे शिवप्रताप शुक्ला 1989, 1991, 1993 आणि 1996 मध्ये सलग चार वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले.

राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच, आता देवेंद्र फडणवीसांनी ‘गिधाडाची’ आठवण करुन दिली

10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करु, प्रियंका गांधींची मोठी घोषणा, जाहीरनाम्यात आणखी काय?

Video | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.