Video: मोदींनी ‘सपा’ची सायकलही बॉम्बस्फोटाशी जोडली, संजय राऊत नागपुरात मिश्किलपणे हसले अन् म्हणाले

आणि शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या देशातली लोकशाही संपत चाललीय, त्याचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे उत्तर देण्याची सुरुवात करताना संजय राऊत मिश्किलपणे हसले

Video: मोदींनी 'सपा'ची सायकलही बॉम्बस्फोटाशी जोडली, संजय राऊत नागपुरात मिश्किलपणे हसले अन् म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊत यांनी टिका केलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 8:16 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) प्रचार सभेतला एक व्हिडीओ सध्या देशभर चर्चेत आहे. या व्हिडीओत मोदींनी अहमदाबाद (Ahmedabad) बाँबस्फोट प्रकरण थेट समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्हं सायकलशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. मोदींच्या याच व्हिडीओवरुन विरोधक आक्रमक झालेत. शिवसेना नेते संजय राऊत हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सकाळी म्हणजे सातच्या आतच त्यांनी रोजची प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकली. यावेळेस पत्रकारांनी मोदींच्या वक्तव्यावर राऊतांना सवाल केला तर त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपा हरत असल्याचं भाकित केलं.

मोदी नेमके काय म्हणालेत? उत्तर प्रदेशातल्या चौथ्या टप्यासाठी प्रचारसभा सुरु आहेत. त्यात नरेंद्र मोदी यांची लखीमपूर खिरीमध्ये सभा होती. याच सभेत मोदींनी समाजवादी पार्टीवर निशाना साधताना थेट अहमदाबादचं बाँबस्फोट प्रकरण अखिलेश यादव यांच्या सायकलशी जोडलं. सायकल ही समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्हं आहे. त्याला टार्गेट करताना मोदी म्हणाले, कदाचित पहिल्यांदाच अतिरेक्यांनी असा बाँबस्फोट केला असेल. तिथेही खूप लोक मारले गेले. पण ह्यांनी काय केलं तर इथं जे समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्हं आहे ना, त्या सायकलवर ह्यांनी बाँब ठेवलेले होते. म्हणजे बघा, सायकलवर बाँब ठेवले होते आणि जिथं लोक भाजीपाला वगैरे विकत घेण्याासाठी येतात तिथं त्या पार्क केल्या होत्या. आणि एकाच वेळेस सायकलवर ठेवलेले बाँब चोहोबाजूंनी फुटले. मी हैराण आहे की, अतिरेक्यांनी सायकललाच का पसंद केलं असेल?

संजय राऊत काय म्हणाले? संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. सकाळी सकाळी पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि मोदींच्या वक्तव्यावर विचारलं तर ते म्हणाले, हे बघा ही तर त्यांची सवय आहे. ही सवय त्यांची मजबूरीसुद्धा आहे. हे लोक ज्यावेळेस पराभवाच्या काठावर उभे असतात त्यावेळेस ते अशा प्रकारचे आरोप करतात. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी हरत आहे. आणि शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या देशातली लोकशाही संपत चाललीय, त्याचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे उत्तर देण्याची सुरुवात करताना संजय राऊत मिश्किलपणे हसले. त्यांचा हा मिश्किलपणा त्यांच्या उत्तरापेक्षाही अधिक राजकीय होता.

हे सुद्धा वाचा:

Prime Minister Narendra Modi| पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर

तुम्ही नागपूर पोलीस कमिश्नरची भेट घेतली? संजय राऊत म्हणाले, माझा इथं आता तळ असेल !

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.