Uttar Pradesh Election Result 2022 : ‘उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला’, योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप कार्यकर्ते आणि जनतेचं असल्याचं म्हटलंय. मोठ्या विजयनानंतर योगी लखनऊतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी फुलांची उधळण करत योगींचं जंगी स्वागत करण्यात आलंय.

Uttar Pradesh Election Result 2022 : 'उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला', योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रियाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:37 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह भाजपचा वियजाचा (Uttar Pradesh BJP Win) वारू पुन्हा एकदा चौफेर उधळलाय. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी लखनऊमध्ये भाजप प्रदेश कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात येतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप कार्यकर्ते आणि जनतेचं असल्याचं म्हटलंय. मोठ्या विजयनानंतर योगी लखनऊतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी फुलांची उधळण करत योगींचं जंगी स्वागत करण्यात आलंय. त्यावेळी बोलताना योगींनी पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिल्याचं म्हटलं.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचं प्रचंड बहुमताचं सरकार बनत आहे. या सर्व राज्यात पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला जनतेनं आशीर्वाद दिलाय. मी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि सर्व नेत्यांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात भाजप चार राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यात यशस्वी ठरला. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. आज भाजप आणि मित्र पक्ष उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचं अभिनंदन आणि आभार मानतो.

निवडणूक आयोग, पोलीस आणि प्रशासनाचेही आभार

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोग, पोलीस आणि प्रशासनाचेही आभार मानले. ‘ या आनंदाच्या क्षणी मी भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळेच हे शक्य झालंय. सात टप्प्यात झालेली निवडणूक पहिल्यांदाच शांततेत पार पडली. त्यानंतर मतमोजणीबाबतही ज्या अफवा पसरवल्या जात होत्या, त्या सर्व अफवा जनतेनं बाजूला करत भाजपला विजयी केलंय. मी तुम्हा सर्वांचं याबाबत अभिनंदन करतो. तसंच निवडणूक आयोग, पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानतो. कोरोना काळातही या सर्वांनी लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं.

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशला पूर्ण वेळ दिला. प्रदेशच्या विकासासह सुशासनासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी त्यांची वेळ आणि विचार मिळत आले आहेत. हे प्रचंड बहुमत भाजपचा राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मॉडेलला उत्तर प्रदेशच्या २५ कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. या आशीर्वादांचा स्वीकार करत सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास हा विचार पुढे न्यावा लागेल, असंही योगी यावेळी म्हणाले.

आजच्या निकालानं परिवारवादाला तिलांजली दिली

भाजपच्या डबल इंजिन सरकारनं सुरक्षा, सुशासनासाठी, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात विकासासाठी जे काम केलं त्याचा हा निकाल आहे. आजच्या निकालाने परिवारवादाला तिलांजली दिली आहे, असा टोला योगींनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला लगावलाय. कोरोना काळातही पंतप्रधान मोदींचं मार्गदर्शन आणि नेतृत्व भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम बनवत आहे. तुम्ही आश्चर्य कराल की उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 2 कोटी पेक्षा अधिक लोकांच्या घरी शौचालय, 1 कोटी 45 लाख घरात वीज, 10 कोटी पेक्षा अधिक लोकांना आरोग्य विमा, 40 लाखापेक्षा अधिक कुटुंबांना छत मिळाल्याला दावाही योगींनी केलाय.

विरोधकांवर जोरदार निशाणा

जेव्हा आम्ही कोरोना, भ्रष्टाचाराशी लढत होतो, तेव्हा हे लोक भाजपविरोधात षडयंत्र रचत होते. आजच्या निकालानं त्यांचे हे प्रयत्न उधळून लावलेत. राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर भाजपला जनतेनं प्रचंड बहुमत दिलंय. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या सर्व मुद्द्यावर आपल्याला खरे उतरावे लागेल, असंही योगी यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Assembly Election Result 2022 : ‘आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत’, चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.