Election Result 2022 Live: जाणून घेऊयात उत्तराखंडच्या निकालाचे दहा महत्त्वाचे मुद्दे!

Uttarakhand Vidhan Sabha Election 2022 LIVE Updates in Marathi: उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात उत्तराखंडच्या निकालाचे दहा मुद्दे.

Election Result 2022 Live: जाणून घेऊयात उत्तराखंडच्या निकालाचे दहा महत्त्वाचे मुद्दे!
हरीश रावत आणि पुष्करसिंह धामी
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 5:29 PM

गल्लीपासून थेट दिल्ली गाजवणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालाचे (Assembly Election Result) चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, भाजप आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता येईल, असा कौल आहे. आज सायंकाळपर्यंत यातले सर्वच्या सर्व निकाल हाती येतील. मात्र, त्यात उत्तर प्रदशेजवळच्या उत्तराखंडमध्ये भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत (Absolute majority) मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक झाली. येथे मुख्य लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच रंगली. यात आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार भाजपने आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये बहुमताने सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झालेल्या आपला येथे मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. जाणून घेऊयात अतिशय रंजक ठरलेल्या उत्तराखंडच्या निवडणूक निकालाचे दहा मुद्दे.

  1. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक झाली. येथे मुख्य लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच रंगली. मात्र, यात आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार भाजपने आघाडी घेतली आहे.
  2. उत्तराखंडमध्ये सध्या भाजप 41 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपच्या वाट्याला फक्त 25 आणि इतरांच्या खात्यात 4 जागा जाण्याची शक्यता आहे. दुपारी चारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल.
  3. उत्तराखंडची माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी दुहेरी झटका बसताना दिसतोय.
  4. एकीकडे काँग्रेस पराभवाच्या छायेत आहेच, दुसरीकडे त्यांचा सुद्धा पराभव होईल, अशी शक्यता आहे.
  5. उत्तराखंडमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला होता.
  6. हरिद्वारमध्ये हरीश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले होते. आता या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
  7. पंजाबमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या आम आदमी पक्षाकडे उत्तराखंडमधील नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. येथे पक्षाला एक तरी जागा मिळणार का, याची उत्सुकता लागली आहे.
  8. उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे सुद्धा पिछाडीवर पडलेत. ते या निवडणुकीत विजय मिळवणार का, हे पाहावे लागेल.
  9. उत्तराखंडमधील लोहाघाट जागेवर काँग्रेसचे खुशाल सिंह अधिकारी 6118 मतांनी विजयी झाले आहेत.
  10. डेहराडून येथील चकराता जागेवरची मतमोजणी पूर्ण झाली असून, येथे काँग्रेसचे विक्रम सिंह नेगी विजयी झाल्याचे समजते. फक्त घोषणा बाकी आहे.

इतर बातम्याः 

tv9 Explainer: कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?

Election Result 2022 Live: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने गाठली मॅजिक फिगर, सपाची शतकी खेळी

Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.