Manipur Election : मणिपूरमध्ये मतदाना दिवशी गोळीबार, एका तरूणाचा मृत्यू; पोलिसांनी गोळी चालवल्याचा भाजपाचा आरोप

मणिपूरमधल्या करोंग मतदार संघात सकाळी मतदान सुरु असताना गोळी चालवली गेली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. करोंगमधल्या एका भाजपच्या उमेदवाराने सुरक्षा रक्षकांनी गोळी चालवल्याने युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.

Manipur Election : मणिपूरमध्ये मतदाना दिवशी गोळीबार, एका तरूणाचा मृत्यू; पोलिसांनी गोळी चालवल्याचा भाजपाचा आरोप
मणिपूर मतदान करताना नागरिक Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:26 PM

मणिपूर – आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आज तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज होणा-या मतदानासाठी मणिपूरमध्ये 1247 मतदान केंद्र तयार कऱण्यात आले आहेत. तिथं आज सकाळपासून मतदार मतदान करीत आहेत. तसेच निवडणुक आयोगाकडून (election commission) मतदान केंद्रांना पुर्णपणे सुरक्षा देण्यात आली आहे. आजच्या दुस-या टप्प्यात अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करतील.

कोणी मारली गोळी ?

मणिपूरमधल्या करोंग मतदार संघात सकाळी मतदान सुरु असताना गोळी चालवली गेली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. करोंगमधल्या एका भाजपच्या उमेदवाराने सुरक्षा रक्षकांनी गोळी चालवल्याने युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. पण सुरक्षा रक्षकांनी का गोळी चालवली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ज्यावेळी तिथं गोळी चालवण्यात आली त्यावेळी तिथं घबराहट पसरली होती. तरूणानं असं कोणतं कृत्य केलं की त्याला गोळी मारली. त्या केंद्रावरती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तिथं तणावाचे वातावरण असल्याचे समजते.

आज मणिपूरमध्ये अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावणार

आज मणिपूरमध्ये अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावणार असल्याच पाहायला मिळतंय. त्यामध्ये मणिपुरचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले O Ibobi Singh, उपमुख्यमंत्री Gaikhangam Gangmei यांच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. दोन्ही मोठे नेते काँग्रेसच्या तिकीटावरती निवडणुक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. आज Thoubal, Chandel, Ukhrul, Senapati, Tamenglong आणि Jiribam या भागात मतदान होणार असून एकूण 8.38 मतदान आहे. आज भाजपचे 22 उमेदवार, काँग्रेसचे 18 उमेदवार, एनपीपीचे 11 उमेदवार नागा पीपल फ्रंडचे 10 उमेदवार मैदानात आहे. सगळ्या माझा विजय होईल असा दावा केला आहे.

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल

NCP Sharad Pawar | पंतप्रधान पुण्यात येताहेत त्यांचं स्वागत, पण ढगफुटी झाली तर आपल्यालाच बघायचं आहे; शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

पैसा माझ्या एकटीच्या घशात जाणार नाही रे, वरपर्यंत पाठवायचेत, लाचखोर ड्रग्ज निरीक्षकाचा निर्लज्जपणा

Non Stop LIVE Update
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.