Assembly Election 2021: आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद होणार

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांकडून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला होता. | Assembly Election 2021 voting

Assembly Election 2021: आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद होणार
विधानसभा निवणुकीची पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 9:38 AM

कोलकाता: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये शनिवारी विधानसभा निवणुकीची पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रिया (West Bengal and Assam Voting) पार पडणार आहे. आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यात 47 जागांवर मतदान पार पडेल. तर पश्चिम बंगालमध्ये 30 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांकडून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे आज प्रत्यक्षात मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात, याचा अंदाज येईल. (West Bengal and Assam Assembly Election 2021 voting day)

पश्चिम बंगालमध्ये काँटे की टक्कर

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा स्टार प्रचारक पश्चिम बंगालच्या प्रचारात उतरल्यामुळे भाजपची ताकद शतपटीने वाढली होती. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे चित्र आहे.

आज पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान झाले होते. या 30 पैकी 27 जागांवर टीएमसीने विजय मिळवला होता. या ठिकाणी भाजपला खातंही खोलता आलं नव्हतं. तर दोन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. एका जागेवर रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीने विजय मिळवला होता त्यामुळे आताही मतदार भाजपची साथ देणार का, हे लवकरच समजेल.

आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई

आसामममध्ये एकूण 126 जागांसाठी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. इथे मुख्य लढत भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए दरम्यान होणार आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 47 जागांवर मतदान होणार असून या ठिकाणी 267 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यात हिंदू आसामी मतदारांसह चहांच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मतदारांचा समावेश असून त्यांची मते निर्णायक मानली जातात. आसामिया मतदार सीएए लागू करण्याच्या विरोधात आहेत.

तर चहा मळ्यातील आदिवासी मतदार रोजंदारी वाढवून मिळत नसल्याने नाराज आहेत. मात्र, 2016मध्ये या दोन्ही घटकांना आपल्याकडे वळण्यात भाजप यशस्वी झाला होता. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा सफाया झाला होता. त्यात आता भाजप यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष हिरेंद्रनाथ गोस्वामी आणि आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांच्या भविष्याचाही निकाल लागणार आहे. तसेच सत्तारुढ भाजप तसेच आसाम गण परिषदेच्या अनेक मंत्र्यांचंही भविष्य आज मतदानपेटीत बंद होणार आहे.

संबंधित बातम्या:

भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब, प. बंगाल विधानसभेचं तिकीट नाहीच

तामिळनाडूत कामराज, आसाममध्ये गोगोई आणि बंगालमध्ये प्रणवदा; वाचा, काँग्रेस नेत्यांना भाजपने कसे केले हायजॅक!

मोफत वीज, 5 लाख रोजगार, महिलांना 2 हजार रुपये; आसाममध्ये राहुल गांधींचा आश्वासनांचा पाऊस

(West Bengal and Assam Assembly Election 2021 voting day)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.