West Bengal Election Results 2021 | कोरोनाने हरवलं, पण मतदारांना जिंकलं, मयत उमेदवार काजल सिन्हा आघाडीवर
खरदाहाचे तृणमूल उमेदवार काजल सिन्हा यांचे 25 एप्रिलला कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. (West Bengal Khardaha TMC Kajal Sinha)

कोलकाता : कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेले पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे (West Bengal Assembly Election 2021) उमेदवार काजल सिन्हा (Kajal Sinha) यांना सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (All India Trinamool Congress) तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काजल सिन्हा यांना पश्चिम बंगालमधील खरदाहा (Khardaha) मतदारसंघात लीड मिळाली आहे. (West Bengal Assembly Election 2021 Khardaha TMC Candidate Kajal Sinha dies of Corona leads)
मतदानानंतर तीनच दिवसात सिन्हांचे निधन
खरदाहा (Khardaha) विधानसभा मतदारसंघ हा याआधीही तृणमूल काँग्रेसकडे होता. अमित मिश्रा इथले आमदार होते. यावेळी मात्र तृणमूलने काजल सिन्हा यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. सिन्हा यांनी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत प्रचार केला. परंतु या काळात त्यांना कोरोनाने गाठलं. सहाव्या टप्प्यात (22 एप्रिलला) खरदाहा मतदारसंघाचं मतदान झालं. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात म्हणजे 25 एप्रिलला उपचारादरम्यान काजल सिन्हा यांची प्राणज्योत मालवली.
पत्नीची पोलिसात तक्रार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चौघा उमेदवारांचा दहा दिवसांच्या काळात कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. काजल सिन्हा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नंदिता सिन्हा (Nandita Sinha) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पतीचा मृत्यू निवडणूक उपायुक्त सुदीप जैन आणि इतर अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा सदोष मनुष्यवध असल्याचा दावाही नंदितांनी केला.
तृणमूलच्या विनंतीकडे दुर्लक्ष
देशात कोरोना संसर्ग वेगाने पसरलेला असताना निवडणूक आयोगाने हलगर्जी केली. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात, तर आसाममध्ये तीन दिवसात तीन टप्प्यात मतदान झाले. मात्र पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान घेऊन सर्वांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप नंदिता सिन्हांनी केला आहे. उर्वरित मतदानाचे टप्पे एकत्र घेण्याबाबत 16 आणि 20 एप्रिल तृणमूलने विनंती करुनही दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला.
तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांचा संताप
Enough is enough.
Trinamool candidate Kajal Sinha recently died of #Covid
His wife files CULPABLE HOMICIDE charge on Sudip Jain, senior official of the Election Commission of India (West Bengal Khardaha TMC Kajal Sinha)
— Derek O’Brien | ডেরেক ও’ব্রায়েন (@derekobrienmp) April 28, 2021
काजल सिन्हा यांच्या विरोधात भाजपने खरदाहा मतदारसंघात शीलभद्र दत्ता (SILBHADRA DATTA) यांना रिंगणात उतरवलं आहे. सुरुवातीच्या कलानुसार दत्ता दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र दोघांमधील मतांचा फरक पाहता कधीही बाजी उलटू शकते.
सकाळी 11.30 वाजताची आकडेवारी :
संबंधित बातम्या :
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये चुरस; डावे हद्दपार होणार?
पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला, भाजप 100 च्या खाली, TMC 186 जागांवर आघाडीवर
(West Bengal Assembly Election 2021 Khardaha TMC Candidate Kajal Sinha dies of Corona leads)