कोलकाता: तृणमलू काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात ममता बॅनर्जी यांचा पराभव हा अटळ आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच बाजी मारेल, अशी कबुली ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या तज्ज्ञांकडूनच देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या क्लब हाऊसमध्ये झालेल्या या गुप्त संभाषणाची माहिती बाहेर फुटली असून आता तृणमलू काँग्रेसचा पराभव अटळ आहे, असा दाव भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. (public chat on Club House Mamata Banerjee’s election strategist concedes that even in TMC’s internal surveys BJP is winning)
अमित मालवीय यांच्या या दाव्यामुळे तृणमूल काँग्रेसची चिंता आणखी वाढली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधीही भाजपचे असाच दावा केला होता. तेव्हादेखील भाजपने ममता बॅनर्जींसाठी काम करणारे निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांचा दाखला देत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघात हरणार असल्याचे म्हटले होते. मात्र, तृणमूल काँग्रेसने हे सर्व दावे फेटाळून लावले होते.
कोलकाता येथील क्लब हाऊसमध्ये तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या एका बैठकीतील गुप्त संभाषण बाहेर फुटल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. आपले बोलणे इतर लोकांकडून ऐकले जात आहे, ही बाब लक्षात येताच तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने बोलायचे थांबवले, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.
मालवीय यांच्याकडून ज्या संभाषणाचा दाखला दिला जात आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरणाची भाजपची चाल यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत साधारण 27 टक्के मतदार असलेल्या अनुसूचित जातीचे लोक आणि मतुआ मतदार हे भाजपला मतदान करतील. काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने गेल्या 20 वर्षात मुस्लिमांचे तुष्टीकरण केले, अशी कबुलीही तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने दिल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे.
Is it open?
That moment when Mamata Banerjee’s strategiest realised that the Club House room was open and his admissions were being heard by the public at large and not just a handful of Lutyens journalist.
Deafening silence followed…
TMC’s election was just thrown away! pic.twitter.com/2XJ4RWbv3K
— Amit Malviya (@amitmalviya) April 10, 2021
यापूर्वी ज्याप्रमाणे देशात अनेक ठिकाणी मोदी लाट दिसून आली तशीच लाट पश्चिम बंगालमध्येही आहे. पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय असल्याची माहिती या गुप्त संभाषणात आहे. तसेच 10 वर्षे सत्तेत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात अँटी-इन्कम्बन्सी आहे. आक्रमक प्रचारामुळे अनुसूचित जातीची मते भाजपकडे वळल्याची कबुलीही या संभाषणात देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
(public chat on Club House Mamata Banerjee’s election strategist concedes that even in TMC’s internal surveys BJP is winning)