शेत नांगरतो, पण मत आपल्यालाच हवं, आमदारकीसाठी मैदानात उतरलेल्या खासदाराचा अनोखा प्रचार!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Election 2021) रंगत आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे.

शेत नांगरतो, पण मत आपल्यालाच हवं, आमदारकीसाठी मैदानात उतरलेल्या खासदाराचा अनोखा प्रचार!
Jagannath Sarkar
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 5:51 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Election 2021) रंगत आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. एकूण 8 टप्प्यात इथे मतदान होणार आहे. त्यामुळे अजून सहा टप्पे बाकी आहेत. मतदारांनी आपल्यालाच पसंती द्यावी यासाठी उमेदवार हर तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. प्रचारादरम्यान एका उमेदवाराने चक्क मतदाराचे शेतच नांगरुन दिलं. (Nadia BJP MP and party candidate from Santipur constituency Jagannath Sarkar drives a tractor during a pre-poll campaign, at Santipur in Nadia)

भाजपचे विद्यमान खासदार जगन्नाथ सरकार (Nadia Jagannath Sarkar BJP mp) यांना भाजपने शांतीपूर विधानसभा मतदारसंघातून (Santipur constituency Jagannath Sarkar) रिंगणात उतरवलं आहे. जगन्नाथ सरकार यांनी नादियातील शांतीपूर्व मतदारसंघात ट्रॅक्टर चालवून आपला प्रचार केला. यादरम्यान, खासदार जगन्नाथ सरकार हे प्रचार करत करत शेतात पोहोचले. इथे एक शेतकरी ट्रॅक्टरने त्याचे शेत नांगरत होता. त्यावेळी खासदार महोदय ड्रायव्हिंग सीटवर बसले. त्यांनी ट्रॅक्टरचा स्टार्टर मारुन, आख्खं शेत नांगरुन दिलं.

पीटीआय या वृत्तसंस्थेने खासदार जगन्नाथ सरकार यांचा हा फोटो प्रसिद्ध केला आहे.

कोण आहेत जगन्नाथ सरकार? (Who is Jagannath Sarkar)

जगन्नाथ सरकार हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत ते रानाघाट लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात भाजपच्या मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे जगन्नाथ सरकार यांना तिकीट मिळालं त्यावेळी त्यांनी तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव केला होता मात्र 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे भाजपने त्यांना शांतीपूर या मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे.

ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला झालं. दुसऱ्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान झालं. या टप्प्यात हायव्होल्टेज नंदीग्रामच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि नंदीग्रामच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.

नंदीग्रामकडे देशाचं लक्ष

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. इथे सर्वात मोठी लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ममतांचं दिग्गजांना पत्र 

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या 

West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच

निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.