West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी यांच्यात लढत होत आहे. मात्र मतदानादरम्यान, शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील 30 जागांसाठी मतदान होत आहे. नंदीग्राम या देशातील नजरा लागलेल्या मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. इथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी यांच्यात लढत होत आहे. मात्र मतदानादरम्यान, शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. बंगालमधील निवडणुकीमधील राडेबाजीचा हा पुढचा अंक आहे. दोनच दिवसापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडाच्या (Ashok Dinda) गाडीवरही दगडफेक झाली होती. (Suvendu Adhikaris convoy attacked allegations on TMC vs BJP in Nandigram during second phase voting of west bengal election 2021)
दरम्यान, आजच्या हल्ल्यात शुभेंदु अधिकारी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहेच, पण त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचंही नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरु असल्याचा आरोप शुभेंदु अधिकारींनी केला. इतकंच नाही तर तृणमूल काँग्रेस इथे बांग्लादेशच्या घोषणा देऊन एका समुहाच्या बळावर विजय मिळवू इच्छित आहे, असंही अधिकारी म्हणाले.
नंदीग्रामकडे देशाचं लक्ष
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. इथे सर्वात मोठी लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक
West Bengal: Vehicle of media personnel attacked near booth number 170 in Kamalpur, Nandigram.
“These are work of Pakistanis, ‘Jay Bangla’ is a slogan from Bangladesh. There are voters from a particular community at that booth who are doing this,” says BJP’s Suvendu Adhikari pic.twitter.com/gMsENDDnA5
— ANI (@ANI) April 1, 2021
अशोक डिंडावरही दगडफेक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी हिंसाचाराच्या मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. यात राजकीय नेते आणि उमेदवारांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. दोन दिवसापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले अशोक दिंडा यांच्यावर हल्ला झाला आहे. अशोक दिंडा यांचा रोड शो सुरु होता. त्यावेळी हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.
अशोक दिंडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोयना विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी या परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे.
ममता बॅनर्जी यांचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या
(Suvendu Adhikaris convoy attacked allegations on TMC vs BJP in Nandigram during second phase voting of west bengal election 2021)