West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा दणदणीत विजय, 213 जागांसह स्पष्ट बहुमत
West Bengal Vidhan Sabha Election Results 2021 LIVE Counting and Updates | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे लाईव्ह अपडेटस पाहण्यासाठी क्लिक करा
कोलकाता: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये (West Bengal Election Results 2021) पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता स्थापन केलीय. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. भाजपला दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलंय. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी रात्री उशीर होण्याची शक्यता आहे. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखल्याचं स्पष्टपणे दिसत आहे (West Bengal Election results 2021 Live updates)
LIVE NEWS & UPDATES
-
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा दणदणीत विजय, 213 जागांसह स्पष्ट बहुमत
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा दणदणीत विजय, 213 जागांसह स्पष्ट बहुमत
-
टीएमसीचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला, नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी
तृणमूल काँग्रेसकडून नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आलीय. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आणि टीएमसीचे नेते शेख सुफीयान यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केलीय. तृणमूल काँग्रेसचं तीन सदस्यीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलं आणि ही मागणी केली. यानंतर नंदीग्रामचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक नंदीग्राम मतमोजणी सेंटरवर पोहोचले.
-
-
बंगालच्या जनमताचा आदर, सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर जनतेचा कौल मान्य असल्याचं मत व्यक्त केलं.
बंगाल की जनता के जनादेश का सम्मान करते हैं।
भाजपा को दिए समर्थन के लिए जनता का आभार व्यक्त करता हूँ। भाजपा एक मजबूत विपक्ष के रूप में बंगाल की जनता के अधिकारों व प्रदेश की प्रगति के लिए निरंतर आवाज उठाती रहेगी।@BJP4Bengal के कार्यकर्ताओं के परिश्रम के लिए उनका अभिनंदन करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) May 2, 2021
-
भाजपचा दणदणीत पराभव केल्याने ममता बॅनर्जींचं अभिनंदन करताना आनंद : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव केल्याबद्दल ममता बॅनर्जींचं आणि तृणमूल काँग्रेसचं अभिनंदन केलंय.
I’m happy to congratulate Mamata ji and the people of West Bengal for soundly defeating the BJP.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
-
बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं, अमित शाहांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक
Video | Nawab Malik | बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं, अमित शाहांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक @nawabmalikncp #AmitShah #WestBengalElections2021 pic.twitter.com/L0t1OfzzWM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
-
-
नंदीग्रामच्या निकालात गडबड, या विरोधात कोर्टात जाणार, मतमोजणी परत घ्या : तृणमूल काँग्रेस
ममचा बॅनर्जींकडून नंदीग्रामच्या निकालात गडबड झाल्याचा आरोप केला आहे. या घोटाळ्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच नंदीग्राममधील मतमोजणी परत घ्या, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केलीय.
-
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून रडीचा डाव, बंगालच्या मतदारांचा भरभरून ममतांना पाठींबा : शरद पवार
शरद पवार म्हणाले, “रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!”
रडीचा डाव! बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
-
मी लढले, आता नंदीग्रामची जनता देईल तो कौल मान्य, टीएमसी पक्ष जिंकलाय : ममता बॅनर्जी
मी लढले, आता नंदीग्रामची जनता देईल तो कौल मान्य, टीएमसी पक्ष जिंकलाय, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलंय. नंदीग्रामची काळजी करु नका. मला एक चळवळ करायची होती म्हणून मी नंदीग्राममधून लढले. टीएमसीने 221 जागा जिंकल्या आहेत.
Don’t worry about Nandigram, I struggled for Nandigram because I fought a movement. It’s ok. Let the Nandigram people give whatever verdict they want, I accept that. I don’t mind. We won more than 221 seats & BJP has lost the election: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/jmp098PF2A
— ANI (@ANI) May 2, 2021
-
‘शपथग्रहणाचा उत्सव साजरा करणार नाही’, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथग्रहणाचा उत्सव साजरा करणार नाही, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलंय.
-
उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख, निवडणूक जिंकल्याबद्दल अनोख्या शब्दात शुभेच्छा
उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख, निवडणूक जिंकल्याबद्दल अनोख्या शब्दात शुभेच्छा https://t.co/UIHS2013zy#CMUddhavThackeray #MamataBenerjee #WestBengal #WestBengalElectionResult2021 #Maharashtra @CMOMaharashtra @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
-
ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा 1200 मतांनी पराभव
West Bengal result live: पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये चुरशीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा 1200 मतांनी पराभव केला.
-
मनसेप्रमुख राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
My heartiest congratulations to @MamataOfficial and her team for their victory in West Bengal assembly elections. #BengalElections2021 #MamtaBanerjee #Didi @AITCofficial pic.twitter.com/tPQlIiQja3
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2021
-
Tamilnadu Election Result live: राज ठाकरेंकडून एम.के. स्टॅलिन यांचं अभिनंदन
राज ठाकरेंकडून एम.के. स्टॅलिन यांचं अभिनंदन
#Tamilnadu #TNElections2021 #DMKwinsTN @mkstalin pic.twitter.com/TDH1H7MUWQ
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2021
-
नंदीग्राम मतदारसंघात चुरशीची लढत; ममता बॅनर्जी अवघ्या 6 मतांनी पिछाडीवर
West Bengal result live: नंदीग्राम मतदारसंघात सध्या ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. गेल्या काही फेऱ्यांपासून ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी आळीपाळीने आघाडीवर येत आहेत. आता 16 व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी अवघ्या सहा मतांनी पिछाडीवर आहेत.
-
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालमध्ये भक्कम विजयाकडे वाटचाल करत असलेल्या तृणमूल काँग्रेसकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
तृणमूल काँग्रेसचे विजयी झालेले उमेदवार
दुलाल दास (महेशतला मतदारसंघ) फिरदौसी बेगम (सोनारपूर) विदेश बोस (उलूवेरिया नॉर्थ) लवली मैत्र (सोनारपूर दक्षिण) सुब्रत मुखर्जी (बालीगंज)
-
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस भक्कम स्थितीत, भाजपला अवघ्या 84 जागांवर आघाडी
West Bengal result live: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 205 जागांवर आघाडीवर, भाजप 84 जागांवर आघाडीवर. राजद नेते तेजस्वी यादव यांच्याकडून ममता बॅनर्जींना शुभेच्छा.
पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत https://t.co/7XgeMXkwLU @NCPspeaks #SharadPawar #MamtaBanerjee #TMC #BJP #WestBengalElectionResults2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
-
नंदिग्राममधून ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर
West Bengal counting latest Update: नंदीग्राम मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मागे टाकले आहे. 14 व्या फेरीअखेर सुवेंदू अधिकारी जवळपास 2331 मतांनी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत शुभेंदू अधिकारी यांना 34430 आणि ममता बॅनर्जी यांना 30655 मते पडली आहेत.
-
नंदिग्राममधून ममता बॅनर्जी पुन्हा पिछाडीवर; सुवेंदू अधिकारींची पुन्हा आघाडी
West Bengal counting latest Update: नंदीग्राम मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना मागे टाकले आहे. सध्या सुवेंदू अधिकारी जवळपास 4000 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत शुभेंदू अधिकारी यांना 34430 आणि ममता बॅनर्जी यांना 30655 मते पडली आहेत.
-
नंदिग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
नंदिग्राममधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा आघाडी, भाजप उमेदवार सुवेंद्रू अधिकारी यांना मागे टाकत 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
-
पश्चिम बंगालमध्ये मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यासारख्या स्टार प्रचारकांबरोबर अनेक बडे नेते आणि मंत्री प्रचारात उतरवले होते. या निवडणुकीसाठी भाजपची अवाढव्य प्रचारयंत्रणा अव्याहत काम करत होती. मात्र, आताचे निकाल पाहता भाजपचे सर्व डावपेच फेल ठरताना दिसत आहेत.
-
भाजपचे ग्रह फिरले, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची आघाडी, तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड
West Bengal result live : पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जसजसा पुढे सरकताना दिसत आहे तसतसे भाजपचे ग्रह फिरताना दिसत आहेत. कारण काहीवेळापूर्वीच नंदीग्राम मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकले आहे. आता सुवेंदू अधिकारी 1417 मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड सुरु आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा 200 ची वेस ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. तर 200 जागा मिळवण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपची शंभरीतच दमछाक होताना दिसत आहे.
-
‘ममता बॅनर्जींनी भाजपचा विजयरथ रोखला’
West Bengal counting latest Update: मध्य प्रदेश, बिहार या राज्यांवर कब्जा करणाऱ्या भाजपचा विजयरथ ममता बॅनर्जी यांनी रोखला असे, वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी केले. भाजपच्या प्रमुख विरोधक म्हणून ममता बॅनर्जी उदयाला आल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आवाज उठवला, असे पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले.
-
पश्चिम बंगालच्या शिबपूर मतदारसंघातून क्रिकेटर मनोज तिवारी आघाडीवर
West Bengal result live : शिबपूर मतदारसंघातून तृणमूलच्या तिकीटावर उभे असलेले क्रिकेटर मनोज तिवारी 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर नंदीग्राम मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर सुवेंदू अधिकारी आपली आघाडी टिकवून आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्यापेक्षा 3686 मतांनी पिछाडीवर आहेत.
-
तृणमूल काँग्रेस 200 पेक्षा जास्त आघाडीवर
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आता 200 पेक्षा अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आता 90 जागांपर्यंत खाली ढकलला गेला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या निवडणुकीत भाजपला धूळ चारणार, अशी चिन्ह आता दिसत आहेत.
-
पश्चिम बंगालच्या 292 जागांचे कल स्पष्ट; तृणमूल काँग्रेसची 198 जागांवर भक्कम आघाडी
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालचे आतापर्यंतचे कल पाहता तृणमूल काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने 198 जागांवर भक्कम आघाडी मिळवली आहे. तर 200 जागांचा दावा करणारा भाजप पक्ष अवघ्या 32 जागांवर आघाडीवर आहे.
-
ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पिछाडीवर
West Bengal result live : पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी बराच वेळापासून पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी चौथ्या फेरीअखेर 3,781 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
-
भाजपचं ‘अब की बार 200’ स्वप्नं हवेत विरणार? TMCची 191 जागांवर आघाडी; भाजपची शंभरीतच दमछाक
West Bengal result live: गेल्या काही तासांमध्ये पश्चिम बंगालच्या निकालाचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेस आता 191 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपची 100चा आकडा गाठतानाच दमछाक होत आहे. सध्या भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपचं ‘अब की बार 200’ स्वप्नं हवेत विरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
-
पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…
पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात… https://t.co/KKhEbHDIoN #BJP #TMC #WestBengalElections2021 #MamtaBannerjee
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
-
तृणमूल काँग्रेस 200 चा आकडा गाठणार का?
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता तीन तास उलटले आहेत. तृणमूल काँग्रेस सध्या तब्बल 191 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. तर संयुक्त मोर्चाचे उमेदवार पाच जागांवर आघाडीवर आहेत.
-
तृणमूल काँग्रेसची मोठी मुसंडी, 187 जागांवर आघाडी; भाजपची घसरण
West Bengal counting latest Update: मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्या काँटे की टक्कर दिसत होती. दोन्ही पक्षांनी शंभरपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, गेल्या तासाभरात हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. भाजपची गाडी 115 जागांवर अडली होती, त्यानंतर आता भाजपच्या जागा 97 पर्यंत कमी झाल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेस 187 जागांवर आघाडीवर आहे. ही आघाडी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार, हे तुर्तास तरी दिसत आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपचे बडे नेते पिछाडीवर
West Bengal result live: पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे बाबूल सुप्रियो, लौकिक चॅटर्जी आणि स्वपन दासगुप्ता हे बडे नेतेही पिछाडीवर आहेत.
-
West Bengal counting latest Update: भाजप संध्याकाळपर्यंत बहुमताचा आकडा गाठेल: कैलास विजयवर्गीय
Too early to say anything because there are so many rounds. Situation will be clear only by evening. We had started from 3 & were challenged that we won’t get even 100, we have crossed that mark. We will cross the magic number too: Kailash Vijayvargiya, BJP#WestBengalPolls pic.twitter.com/ZS5LmrGcNF
— ANI (@ANI) May 2, 2021
-
West Bengal result live: तृणमलू काँग्रेसला मोठा विजय मिळेल: ममता बॅनर्जी
West Bengal result live: मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस दोन तृतीयांश मते मिळवून विजयी मिळेल, असा दावा केला आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद मतदारसंघातील निकालाचे चित्र पाहिल्यावर ममता बॅनर्जी समाधानी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
-
तृणमूल काँग्रेसची 164 जागांवर आघाडी; भाजपची घोडदौड मंदावली?
West Bengal result live: मतमोजणीला अडीच तास उलटल्यानंतर तृणमूल काँग्रेसने 164 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 115 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेस आघाडीवर असलेल्या जागांमध्ये फारसा फरक नव्हता. परंतु आता भाजपची गाडी 120 जागांच्या पुढे सरकताना दिसत नाही
-
ममता बॅनर्जी पराभवाच्या छायेत? नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी 8106 मतांनी आघाडीवर
West Bengal result live : पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी तिसऱ्या फेरीत 8106 मतांची आघाडी घेतली आहे. हा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असली तरी ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यास तो पक्षासाठी मोठा धक्का असेल.
-
तृणमलू काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल; TMC 142 जागांवर आघाडीवर
West Bengal result live: तृणमूल काँग्रेसला भाजपकडून कडवी टक्कर मिळत असली तरी TMC आता बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने 142 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 116 जागांवर आघाडी आहे.
-
भाजप आणि तृणमूल काँग्रेसची शंभरीपार मजल
West Bengal counting latest Update: तृणमूल काँग्रेस 128, भाजप 108 जागांवर आघाडीवर; काँग्रेस आणि डाव्यांना प्रत्येकी दोन जागांवर आघाडी, संयुक्त मोर्चाला पाच जागांवर आघाडी
-
तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत; तृणमूल काँग्रेस 100 , भाजपची 93 जागांवर आघाडी
-
ममता बॅनर्जींना मोठा धक्का; नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारींची आघाडी
West Bengal result live : पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये तासाभराच्या मतमोजणीनंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली आहे. हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
-
पानिहाटी मतमोजणी केंद्रावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला चक्कर
West Bengal: Gopal Som, a counting agent of Congress candidate from Panihati (North 24 Parganas), Tapas Majumder, was taken to a hospital after he fell unconscious at the counting centre. pic.twitter.com/uCpeJxuF11
— ANI (@ANI) May 2, 2021
-
नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी आघाडीवर
West Bengal result live: पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. भाजपचे सुवेंद अधिकारी पिछाडीवर आहेत. सध्याच्या माहितीनुसार, इतर मतदारसंघात लाभपूर मतदारसंघात तृणमूल, विधाननगरमध्ये भाजप आणि बालीगंजमध्ये तृणमूलचे सुब्रत मुखर्जी आघाडीवर आहेत.
-
तृणमूल काँग्रेस 61, भाजप 54 जागांवर आघाडीवर; काँग्रेस-डाव्यांची पाटी कोरी
West Bengal counting latest Update: पश्चिम बंगालमधील मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे तृणमूल काँग्रेसला कडवी टक्कर मिळताना दिसत आहे. तर प्राथमिक टप्प्यात काँग्रेस आणि डाव्यांची पाटी अद्याप कोरी आहे. सध्याच्या माहितीनुसार, तृणमलू काँग्रेस 61 तर भाजप 54 जागांवर आघाडीवर आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना भोपळा?
West Bengal result live : पश्चिम बंगालमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. तेव्हापासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. तर काँग्रेस आणि डाव्यांना प्राथमिक टप्प्यात एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्यांचा सुपडा साफ होण्याचे संकेत मिळत आहेत.
-
50 जागांचे प्राथमिक कल हाती, तृणमूल काँग्रेस 26 तर भाजपची 24 जागांवर आघाडी
West Bengal result live: पश्चिम बंगालच्या 50 जागांवरील प्राथमिक कल हाती; 26 जागांवर तृणमूल काँग्रेस, तर भाजपची 24 जागांवर आघाडी. बाकुडा विधानसभा मतदारसंघात भाजपची आघाडी
-
पश्चिम बंगालमध्ये काँटे की टक्कर; तृणमूल काँग्रेस 14, भाजप 11 जागांवर आघाडीवर
West Bengal Mamata Banerjee result live: पश्चिम बंगालमध्ये पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरुवात. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर, तृणमूल काँग्रेस 14 आणि भाजपची 11 जागांवर आघाडी
-
पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात भाजपची आघाडी
West Bengal counting latest Update : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती. भाजपची 6 जागांवर आघाडी, तृणमूल काँग्रेसची पाच जागांवर आघाडी
-
पश्चिम बंगालमधील 108 केंद्रांवर पोस्टल बॅलेटची मोजणी सुरु
Counting of votes for #AssemblyElections2021 begins. Votes being counted across Assam, Kerala, Puducherry, Tamil Nadu and West Bengal. pic.twitter.com/vBUGNP0R5Q
— ANI (@ANI) May 2, 2021
-
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात
West Bengal counting latest Update : पश्चिम बंगालमध्ये टपाल मतांच्या मोजणीला सुरुवात, थोड्याचवेळात आता या निवडणुकीचा पहिला कल हाती येईल. 108 केंद्रावर मतमोजणी होणार.
-
निवडणुकीत कोणीही जिंकलं तरी फरक पडत नाही; काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
West Bengal result live: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधून घेणारे वक्तव्य केले. आज निकालाचा दिवस आहे. मात्र, इतक्या नुकसानानंतर कोणीही जिंकले तरी काही फरक पडत नाही. आजच्या घडीला लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.
-
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी
West Bengal: Officials, counting agents and others arrive at a counting centre at Siliguri College in Siliguri. Counting of votes for #AssemblyElections2021 to begin shortly. pic.twitter.com/RaZQKf2Ebo
— ANI (@ANI) May 2, 2021
-
तृणमलू काँग्रेसच्या उमेदवाराची तक्रार
West Bengal election result: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सोवोंदेव चटोपाध्याय यांच्या दाव्यानुसार ते मतमोजणी केंद्रावर आले तेव्हा स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडा होता. याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
-
पश्चिम बंगालच्या निकालावर संजय राऊतांची भविष्यवाणी
West Bengal result live : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये बाजी मारल्यानंतर ममता बॅनर्जी विरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील. तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल, यावर देशाच्या राजकारणाची आगामी वाटचाल अवलंबून असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
-
पश्चिम बंगालमध्ये थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात
West Bengal Vidhan Sabha Election Results 2021 LIVE Counting and Updates | पश्चिम बंगालमध्ये थोड्याचवेळात सर्व मतदान केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. उमेदवारासह दोन व्यक्तींनाच मतमोजणी केंद्राच्या परिसरात उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर कोणतीही विजय मिरवणूक काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
Published On - May 03,2021 3:24 AM