मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमाचा प्रिव्ह्यू, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाचे प्रतीक्षेत होते. अखेर 7 सप्टेंबर रोजी ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली. किंग खान याच्या अनेक चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने जवळपास 75 कोटी रुपयांचा कमाई केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
महत्त्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवार असल्यामुळे शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्ही जर सिनेमा पाहिला नसेल किंवा सिनेमा पाहण्यासाठी जाणार असाल. तर ‘जवान’ सिनेमातील पाच महत्त्वाचे मुद्दे नक्की जाणून घ्या..
1 – सिनेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जवान’ सिनेमात मुख्य भूमिका अभिनेता किंग खान साकारत आहे. ज्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात मोठी कमाई करत आहे. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा देखील चर्चेत आहे…
2 – ‘जवान’ सिनेमा मल्टीस्टारर सिनेमा आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेता विजय सेतुपती, अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
3 – सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन आहेत. ज्याप्रकारे सिनेमात ॲक्शन सीन दाखवण्यात आले आहेत, असे सीन यापूर्वी कधीही किंग खान याच्या सिनेमात पाहिले नसतील. ॲक्शन सीनमुळे सिनेमा चर्चेत आहे. ‘पठाण’ सिनेमात देखील ॲक्शन सीन होते. ज्यामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
4 – सिनेमात अनेक ॲक्शन सीन आहेत. यासोबतच सिनेमात अनेक ट्विस्ट देखील आहेत. ज्यामुळे सिनेमात एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. सिनेमात अनेक रंजक गोष्टी असल्यामुळे सिनेमा खास आहे.
5 – किंग खान याने ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून अनेक सोशल मेसेज दिले आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या, आरोग्याच्याबाबतीत होणारा भ्रष्टाचार यांसरख्या अनेक गंभीर विषयांवर ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.