मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कार्तिक आर्यन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. विशेष म्हणजे ज्यावेळी बाॅलिवूडच्या (Bollywood) मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट धमाका करताना दिसले. कार्तिक आर्यन हा सोशल मीडियावरही कायमच सक्रिय दिसतो.
आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कार्तिक दिसतो. काही दिवसांपूर्वीच आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग विदेशात करताना कार्तिक आर्यन हा दिसला. कार्तिक आर्यन याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला आणि हा चित्रपट हिट ठरला.
सत्यप्रेम की कथा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसली. सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कियारा आणि कार्तिक आर्यन दिसले. सत्यप्रेम की कथा रिलीज झाल्यानंतर लगेचच कार्तिक आर्यन याने विदेशात आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरू केलीये.
नुकताच आता कार्तिक आर्यन याने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये टेन्शन बघायला मिळतंय. कार्तिक आर्यन याच्यासोबत मोठा अपघात झालाय. कार्तिक आर्यन याने एक पोस्ट शेअर करत म्हटले की, आज एक वेगळ्या प्रकारचा अपघात झालाय. मी अजूनही त्याच्यावर नियंत्रण मिळवत आहे. काय झाले ते मी आता उद्याच सांगू शकेन…
आता कार्तिक आर्यन याची ही पोस्ट पाहून चाहत्यांचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय. नेमके काय घडले याबद्दल कोणालाही काही कळू शकत नाहीये. कार्तिक आर्यन याच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिले की, मला तर आज रात्रभर टेन्शनमुळे झोप येणार नाहीये. दुसऱ्याने लिहिले की, काळजी घे रे बाबा.
तिसऱ्याने लिहिले की, कार्तिक आर्यन तू काळजी घे…बाॅलिवूडमधूनच तुला धोका आहे. कार्तिक आर्यन याचे चाहते सतत त्याला नेमके काय घडले हे विचारताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी भर कार्यक्रमात एक मुलगी कार्तिक आर्यन याला लग्नासाठी प्रपोज करताना दिसली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला.