सरबजित सरकार उर्फ नील रनौत हा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असतो. त्रिपुरामधील खेड्यात राहणारा हा नील जुगाड करुन बॉलिवूड अभिनेत्रींना कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. एवढंच नाही तर चो उत्तम डान्स देखील करतो. नील इतका हुशार आहे की त्याने दीपिका पादुकोणसारखी हा सुंदर पांढरा ड्रेस केवळ कागदानं तयार केला आहे.
नीलचं खरं नाव सरबजित सरकार आहे मात्र त्यानं त्याचं नाव बदलून नील राणौत ठेवलं आहे. कारण त्याला निळा रंग आणि कंगना रनौत खूप आवडते. त्याचं केळीच्या पानांनी आदिती राव हैदरी सारखा ही सुंदर ग्रीन साडी डिझाइन केली आहे.
हिरवी वाळलेली पानं आणि इतर झाडांच्या फांद्या वापरत त्यानं हा सुंदर ड्रेस तयार केला आहे.
नीलनं आलिया भट्टसारखा लाल फुलांचा सुंदर ड्रेस बनवला. नील सांगतो की कुटुंबातील सदस्य त्याला खूप वाईट वागवायचे पण त्यानं अबू जानी आणि संदीप खोसलासाठी रॅम्प वॉक केल्यानंतर आता घरच्यांचा पाठिंबा मिळत आहे.
प्रियंका चोप्रासारखा हा ड्रेस नीलने 1 शर्ट, 1 पेटीकोट, 1 टीशर्ट आणि पेपरने बनविला आहे. एवढंच नाही तर नील या कलाकारांचं लक्ष वेधत असतो. अनेकदा त्याचे ड्रेस कॉपी केलेली फोटो कलाकार त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर करत असतात.