Akshardham Terror Attack | अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर, लवकर सिनेमा भेटीला
अक्षरधाम मंदिरावरील दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या घटनेवर स्टेट ऑफ सीज : अक्षरधाम चित्रपट येणार आहे. हा हल्ला 18 वर्षांपूर्वी झाला होता. (Film on Akshardham Terror Attack)
नवी दिल्ली- बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्यकथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टेट ऑफ सीज: 26/11 च्या निर्मात्यांनी आता ‘स्टेट ऑफ सीज: अक्षरधाम’ चित्रपटाची घोषणा केली आहे. 2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर 2 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. (Film will made on Akshardham Terror Attack)
अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या, जखमी झालेल्या आणि भारतीय सुरक्षा दलांच्या सन्मानासाठी ‘स्टेट ऑफ सीज: अक्षरधाम’ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्टेट ऑफ सीज: अक्षरधाम हा चित्रपट लवकरच झी5 प्रिमियम वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत झी5 प्रिमियमच्या ट्विटरवरून घोषणा करण्यात आलीय.
A tribute to the lives lost in Akshardham this day and the bravery of the NSG who fought and ended the siege. State of Siege: Akshardham. Coming soon. #SahasKiVijay#StateOfSiege #ComingSoon #SOSAkshardham #Akshardham pic.twitter.com/ZrVR3gugSR
— ZEE5Premium (@ZEE5Premium) September 24, 2020
गुजरातची राजधानी गांधीनगर शहरातील अक्षरधाम मंदिरावर 18 वर्षांपूर्वी 24 सप्टेंबर 2002 ला दोन दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. यामध्ये 30 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेत 90 हून अधिक लोक जखमी झाले होते. अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्यावरिल चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चित्रपटातील कलाकारांविषयी माहिती समोर आलेली नाही.
दहशतवादी हल्ल्यांवरिल घटनांवर आलेल्या चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली होती. या चित्रपटाला भारतीय प्रेक्षक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
ड्रग्ज चॅट ग्रुपची ‘अॅडमिन’ दीपिका पदुकोण, मॅनेजरची खळबळजनक कबुली
एनसीबीच्या प्रश्नांना सामोरी जाणार बॉलिवूडची ‘मस्तानी’, चॅटमध्ये ‘माल’चा उल्लेख पडला भारी
(Film will made on Akshardham Terror Attack)