कधी काळी एकमेकांचे खास मित्र होते संजय दत्त-गोविंदा, ‘या’ एका चुकीमुळे तुटले नाते!
बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) आणि गोविंदा (Govinda) यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांनी रुपेरी पडद्यावर एकत्र मिळून खूप धमाल केली आहे. चाहत्यांनीही त्यांच्या या जोडीला खूप पसंत केले.
मुंबई : बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) आणि गोविंदा (Govinda) यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांनी रुपेरी पडद्यावर एकत्र मिळून खूप धमाल केली आहे. चाहत्यांनीही त्यांच्या या जोडीला खूप पसंत केले. दोघांचे नातं खूप चांगले होते. या दोन अभिनेत्यांमध्ये इतके चांगले संबंध होते की, जर गोविंदा सेटवर नेहमी उशिरा यायचा तरीही संजय दत्तने कधीही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्यावर रागही व्यक्त केला नाही. पण या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं, ज्यामुळे त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले (A movie breaks the friendship between Govinda And Sanjay Dutt).
या दोघांनी मिळून दशक गाजवलं. मात्र, एकीं शुल्लक कारणामुळे या दोघांमध्ये इतके वितुष्ट आले की, पुन्हा ते एकत्र दिसले नाहीत. त्यांची जोडी तुटल्याने चाहत्यांना देखील धक्का बसला होता.
दृश बदलली नाहीत, मात्र नाती बदलली…
गोविंदा आणि संजय दत्त, डेव्हिड धवनच्या ‘एक और एक अकरा’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. चित्रपटाच्या एका दृश्यात गोविंदाला काही बदल करून हवे होते. पण, डेव्हिड धवन यांना हा बदल योग्य वाटला नाही आणि त्यांनी तसे करण्यास देखील नकार दिला.
जेव्हा संजय दत्तला हे कळले तेव्हा, त्याने डेव्हिड धवनची बाजू घेतली आणि त्यांचे म्हणणे बरोबर असल्याचे म्हटले. गोविंदाला हा गोष्ट अजिबात आवडली नाही. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सर्व काही ठीक होते, पण संजय दत्त आणि गोविंदाचे या नाते पूर्वीसारखे नव्हते. त्या दोघांनी भलेही हा चित्रपट पूर्ण केला असेल, मात्र ते एकमेकांशी बोलले नाहीत. यानंतर ते दोघे पुन्हा एकत्र दिसले नाहीत (A movie breaks the friendship between Govinda And Sanjay Dutt).
जोडीचे एकापेक्षा एक धमाल चित्रपट
गोविंदा आणि संजय दत्त या जोडीने ‘हसीना मान जायेगी’, ‘जोडी नंबर 1’, ‘दो कैदी’, ‘एक और एक ग्यारह’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्त आणि गोविंदाची जोडी ही चित्रपट निर्मात्यांची आवडती जोडी होती.
संजय दत्तचे अंडरवर्ल्डमधील एका व्यक्तीशी बोलत असतानाचे, त्याचे रेकॉर्डिंग उघडकीस आले, तेव्हा दोघांमध्ये हा वाद आणखी वाढला. या कॉल दरम्यान, संजय दत्तने गोविंदाचा देखील उल्लेख केला होता. संजय दत्त या कॉलवर असं म्हणाला की, गोविंदा सेटवर नेहमी उशिरा येतो. असे म्हटले जाते की, संजय दत्तने रेकॉर्डिंगमध्ये गोविंदालाही शिवीगाळ केली होती. त्यानंतर मात्र यांच्या नात्यातील तेढ वाढतच गेले आणि ते पुन्हा एकत्र दिसले नाहीत.
(A movie breaks the friendship between Govinda And Sanjay Dutt)
हेही वाचा :
Bollywood Expensive Cars | बॉलिवूडकरांचे लक्झरी शौक, कोरोना काळातही खरेदी केल्या महागड्या गाड्या!
बिग बींवर लागला होता दंगल भडकवल्याचा आरोप, श्री अकाल तख्त साहिबला लिहिलेले जुने पत्र व्हायरल!
Arijit Singh | प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी https://t.co/JGO4MfDlsL #Arijitsingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021