PM MODI यांच्या जीवनावर नवा बायोपिक, साऊथचा हा सुपरस्टार साकारणार मोदींची भूमिका…

सध्या बायोपिकचे पिक आले आहे. एकामागोमाग प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या जीवनावर चरित्रपट येत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर दुसरा बायोपिक येत आहे. या बायोपिक मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीजचे प्रसिद्ध अभिनेते सत्यराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहेत.

PM MODI यांच्या जीवनावर नवा बायोपिक, साऊथचा हा सुपरस्टार साकारणार मोदींची भूमिका...
PM MODI Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 6:57 PM

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पुन्हा एकदा आत्मचरित्रात्मक चित्रपट येणार आहे. या चित्रपटात साऊथ इंड्रस्ट्रीतील मोठा कलाकार मोदी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे काम यावर्षी सुरु होणार आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका तामिळनाडूचे सुपरस्टार अभिनेते सत्यराज साकारणार आहेत. साऊथ इंड्रस्ट्रीचे अभ्यासक रमेश बाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येणाऱ्या बायोपिकची माहीती दिली आहे.

तामिळ अभिनेते सत्यराज यांनी ‘बाहुबली’ चित्रपटात कट्टापा याची गाजलेली भूमिका केली होती. थोर समाज सुधारक पेरियार यांच्या जीवनावरील बायोपिक मध्येही तामिळ अभिनेते सत्यराज यांनी केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. आता सत्यराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका करणार आहेत. हा नवा चित्रपट बॉलिवूडचे निर्माते काढीत असून पॅन इंडियन प्रोजेक्ट अंतर्गत हिंदी, तामिळ, तेलगु, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषेत हा चित्रपट येणार आहे.

येथे पाहा ट्वीट –

 मोदी यांच्यावरील दुसरा बायोपिक

साऊथ इंडस्ट्रीतील रमेश बाला यांनी पीएम मोदी यांच्यावर तयार होणाऱ्या बायोपिक आणि तिच्यातील कास्टची माहीती दिली आहे. हा चित्रपट कोण तयार करीत आहे ? या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता कोण आहेत ? या चित्रपटात कोण-कोण अभिनेते आहेत याची उत्तरे कळालेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रथमच बायोपिक येत नसून याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साल 2019 मध्ये एक बायोपिक आला होता. अभिनेते विवेक ओबेराय याने या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका केली होती. उमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे लेखन अनिरुद्ध चावला यांनी केले होते. यात विवेक ओबेरायचे वडील ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा देखील रोल होता. हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.