मुंबई : अर्चना गाैतम ही खतरो के खिलाडी 13 मध्ये धमाका करताना दिसत आहे. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधील अनेक स्पर्धेक हे खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झाले आहेत. बिग बाॅस 16 मध्ये एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे अर्चना गाैतम हिचे. अर्चना गाैतम हिने बिग बाॅसमध्ये धमाका केला. अर्चना गाैतम (Archana Gautam) ही बिग बाॅसच्या घरात जवळपास सर्वांसोबत भांडणे करताना दिसली. इतकेच नाही तर एका छोट्या भांडणामध्ये अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला. अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या गळ्याला मोठी दुखापत केली. अर्चना गाैतम ही बिग बाॅसच्या घरात जवळपास सर्वच सदस्यांसोबत भांडणे करत होती.
अर्चना गाैतम ही बिग बाॅस संपल्यानंतरही प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना अनेकदा अर्चना गाैतम ही दिसली आहे. नुकताच अर्चना गाैतम ही रोहित शेट्टी याच्या खतरो के खिलाडी 13 मध्ये सहभागी झालीये. सोशल मीडियावर खतरो के खिलाडी 13 च्या सेटवरील अनेक फोटो शेअर करताना अर्चना गाैतम ही दिसत आहे.
नुकताच अर्चना गाैतम हिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्चना गाैतम ही ओपन गाडीमध्ये धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. मात्र, डान्स करताना अचानक अर्चना गाैतम ही पडते. हा व्हिडीओ पाहून लोक आपले हसू आवरू शकत नाहीयेत.
अर्चना गाैतम हिच्या मागे गुम है किसी के प्यार में फेम पाखी देखील दिसत आहे. मात्र, अर्चना गाैतम हिचा डान्स पाहून पाखीला हसू आवरत नाहीये. मुळात म्हणजे अर्चना गाैतम ही कधी काय करेल याचा अजिबात अंदाजा लावला जाऊ शकत नाही. अर्चना गाैतम हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
अर्चना गाैतम हिच्या भावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. इफ्तार पार्टीमध्ये अर्चना गाैतम हिच्या भावाला प्रवेश दिला गेला नव्हता. यानंतर अर्चना गाैतम ही त्यांना माझ्या भाऊ असून तो माझ्यासोबत आल्याचे देखील सांगताना दिसत होती. शेवटी अर्चना गाैतम ही तिच्या भावाला तू घरी जा म्हणताना दिसत होती.